

Salman Khan : कार बॉम्बने उडवून देऊ, सलमान खानला आली नवी धमकी; पोलीस तपास सुरू
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्सॲप नंबरवर सलमानला उद्देशून ...
मंगा कलाकार आणि भविष्यवेत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऱ्यो तात्सुकी या जपानच्या भविष्यवेत्त्याने जुलै २०२५ मध्ये येणारा जलप्रलय हा २०११ च्या त्सूनामीपेक्षा महाभयंकर असेल, अशी भीती ऱ्यो तात्सुकी या जपानच्या बाबा वेंगाने व्यक्त केली आहे. हे भाकीत खरे ठरल्यास लाखो नागरिकांचा मृत्यू आणि अब्जावधींच्या मालमत्तेची हानी अटळ आहे. असंख्य गावं आणि शहरं पाण्याखाली जातील, असंही भाकीत ऱ्यो तात्सुकी या जपानच्या बाबा वेंगाने वर्तविले आहे. महाप्रलय आणणाऱ्या त्सूनामीमुळे प्रामुख्याने जपान, फिलिपिन्स, इंडेनोशिया, तैवान या देशांची वाताहात होईल; असे ऱ्यो तात्सुकी या जपानच्या बाबा वेंगाने सांगितले.

Railway News : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर धावणार ८० वातानुकूलित लोकल फेऱ्या
मुंबई : मध्य रेल्वेच्या (Central Railway) मुख्य मार्गावर (Main Line) बुधवार १६ एप्रिलपासून ८० वातानुकूलित लोकल फेऱ्या होणार आहेत. याआधी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ...
बल्गेरियातील गूढवादी आणि वनौषधीशास्त्रज्ञ वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा यालाच बाबा वेंगा म्हणायचे. लहानपणापासूनच अंध असलेल्या या व्यक्तीने केलेली अनेक भाकीते गाजली. बाबा वेंगा हा भविष्यवेत्ता म्हणून प्रसिद्ध झाला. तसाच जपानचा ऱ्यो तात्सुकी हा भविष्यवेत्ता म्हणून प्रसिद्ध आहे. ऱ्यो तात्सुकी याला जपानचा बाबा वेंगा या नावानेही ओळखतात. या ऱ्यो तात्सुकी अर्थात जपानच्या बाबा वेंगाने जुलै २०२५ मध्ये पृथ्वीवर जलप्रलय येईल असे भाकीत वर्तविले आहे. त्याची डायरी 'मी पाहिलेले भविष्य' नावाने १९९९ मध्ये प्रकाशित झाली आहे.
ऱ्यो तात्सुकी अर्थात जपानच्या बाबा वेंगाने १९९१ मध्ये गायक फ्रेडी मर्क्युरीचा मृत्यू आणि १९९५ मध्ये जपानमध्ये झालेल्या भूकंपासह अनेक भाकीते केली होती जी खरी ठरल्याचे सांगितले जाते. यामुळे त्याने वर्तविलेल्या जुलै २०२५ मधील जलप्रलयाच्या भाकिताकडे अनेकजण गांभिर्याने बघत आहेत.
अस्वीकरण : ही इंटरनेटवरुन संकलित केलेली माहिती आहे. या माहितीची पुष्टी प्रहार करत नाही.