Wednesday, May 7, 2025

मनोरंजनमजेत मस्त तंदुरुस्तताज्या घडामोडी

Aishwarya Narkar : ऐश्वर्या नारकर यांनी काजूपासून बनवला 'हा' नवीन कोकणी पदार्थ

Aishwarya Narkar : ऐश्वर्या नारकर यांनी काजूपासून बनवला 'हा' नवीन कोकणी पदार्थ

मुंबई: मालिकांमधून आपली स्वतःची विशेष ओळख बनवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) कायमच सोशल मीडियावर सक्रिय दिसतात. त्यांनी मराठी चित्रपट तसेच नाटक ही केले आहे. आता सोशल मीडियावर त्यांचा एक विडिओ खुपच ट्रेन्डीला आहे. काजू पासून त्यांनी एक वेगळा पदार्थ तयार केला होता. त्यात पण त्यांच्या चाहत्यांनी त्यांना खुप चांगला प्रतिसाद दिला आहे .



काजूच्या बोंडूचं भरीत' रेसिपी


काजूच्या बोंडूचं भरीत' (Cashew Recipe) बनवण्यासाठी सर्वप्रथम काजूच्या बोंडांचे तुकडे करून कुकरमध्ये शिजवून घ्या. एका बाऊलमध्ये काजूच्या बोंडांचे तुकडे मॅश करून घ्या. यात मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून मिक्स करा. त्यानंतर थोडे दही सुद्धा घाला. चवीनुसार मीठ आणि साखर घालून मिश्रण एकजीव करा. आता पॅनमध्ये तूप आणि हिंग टाकून फोडणी तयार करा. जी काजूच्या बोंडाच्या मिश्रणावर टाका. अशाप्रकारे 'काजूच्या बोंडूचं भरीत' तयार झाले आहे.






 










View this post on Instagram























 

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)





मे महिना आलं कि सगळ्यांना कोकणाची आठवण येते. सुट्टी मध्ये गावाला जायची मज्जाच वेगळी असते. अशीच गावाला मज्जा करायला ऐश्वर्या नारकर गेल्या आहेत तेव्हा त्यांनी काजू पासून एक वेगळा पदार्थ बनवला आणि तो विडिओ सोशल मीडियावर टाकला. हा विडिओ बघून चाहत्यांनी खुप चांगली प्रतिक्रिया वक्त केली. आधीपासूनच काजूला कोकणाचा राजा बोलतात आता तर ऐश्वर्या नारकर यांच्या व्हिडिओने ते सिद्धच केलं..

Comments
Add Comment