
/>
रॉबर्ट वाड्रा यांची पत्नी प्रियांका गांधी वाड्रा केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करते तर मेहुणे राहुल गांधी हे उत्तर प्रदेशमधील रायबरेली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. तसेच रॉबर्ट वाड्रा यांच्या सासूबाई सोनिया गांधी राजस्थानमधून काँग्रेस कोट्यातून राज्यसभेवर गेल्या आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेले सर्व नातलग जनतेसाठी खूप काम करत असल्याचे .रॉबर्ट वाड्रा म्हणाले. त्यांनी नातलगांकडून खूप काही शिकत असल्याचे सांगितले. काही राजकारणी माझ्यावर आरोप करतात पण ते राजकीय हेतूने प्रेरित असेच आरोप आहेत; असे रॉबर्ट वाड्रा म्हणाले. त्यांनी मेहुल चोक्सीला परदेशात झालेल्या अटकेचे स्वागत केले. केंद्र सरकारने लवकरात लवकर चोक्सीला भारतात आणावे. चोक्सीवर भारतीय कायद्यानुसार कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणी रॉबर्ट वाड्रा यांनी केली.
/>
रॉबर्ट वाड्रा २०२४ मध्ये अमेठीतून लोकसभेची निवडणूक लढणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. पण अखेरच्या क्षणी काँग्रेसने त्यांच्याऐवजी गांधी परिवाराचे विश्वासू आणि निष्ठावान कार्यकर्ते किशोरी लाल यांना संधी दिली. किशोरी लाल अमेठीतून लोकसभेची निवडणूक जिंकले आणि भाजपाच्या स्मृती इराणी यांचा पराभव झाला. किशोरी लाल यांना पाच लाख ३९ हजार २२८ तर स्मृती इराणी यांना तीन लाख ७२ हजार ०३२ मते मिळाली. यामुळे भविष्यात काँग्रेस रॉबर्ट वाड्रा यांचा खासदारकीसाठी विचार करणार का ? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे.