कल्याण : कल्याण पूर्वेकडील चक्कीनाका भागात २३ डिसेंबर २०२४ रोजी खाऊ आणायला गेलेल्या १३ वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी विशाल गवळी याने तळोजा कारागृहात आत्महत्या केली. तळोजा कारागृहाच्या शौचालयात जाऊन त्याने पहाटे चार ते पाच दरम्यान कधीतरी गळफास लावून घेत आत्महत्या केली. विशालच्या आत्महत्येप्रकरणी निवृत्त न्यायाधीश चौकशी करणार असल्याचे समजते.
विशालवर आधीपासूनच दोन विनयभंग, मुलावर लैंगिक अत्याचार, दोन वेळा मारामारी आणि एक जबरी चोरी केल्याचा गुन्हा दाखल होते. हे सहा गुन्हे केलेल्या आणि तडीपारीचा अनुभव घेतलेल्या विशालने कल्याणमध्ये तेरा वर्षांच्या मुलीचे अपहरण केले, नंतर तिच्यावर अत्याचार करुन तिची हत्या केली. यानंतर विशालने पत्नीच्या मदतीने मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. हे कृत्य केल्यानंतर विशाल शेगावला जाऊन लपला होता. पण नोकरीच्या ठिकाणी रजा मिळवे कठीण होते आणि पैसे आवश्यक होते म्हणून विशालची पत्नी कल्याणच्या घरीच थांबली होती. बेपत्ता मुलीची चौकशी करत पोलीस आले त्यावेळी त्यांना विशालच्या घराच्या जवळ रक्ताचे डाग दिसले. या प्रकरणी कसून चौकशी केल्यावर अखेर विशालच्या पत्नीने सर्व माहिती दिली. यानंतर पोलिसांनी विशालला शेगावमध्ये जाऊन अटक केली होती. विशालला न्यायालयीन कोठडी देण्यात आल्यामुळे त्याची रवानगी तळोजा कारागृहात झाली होती. तिथेच त्याने आत्महत्या केली.
नॅशनल हेराल्ड प्रकरणी ‘ईडी’कडून ७०० कोटींची मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू
विशालची आतापर्यंत तीन लग्न झाली होती. पहिल्या दोन्ही लग्नांनंतर काही काळाने त्याच्या पत्नी निघून गेल्या होत्या. तिसरी पत्नी – साक्षी ही खासगी बँकेत नोकरी करत होती आणि त्याच्या सोबतच होती. विशालने जेव्हा तेरा वर्षांच्या मुलीचे अपहरण केले, नंतर तिच्यावर अत्याचार करुन तिची हत्या केली त्यावेळी साक्षी घाबरली होती. पण विशाल सोडून देईल या भीतीपोटी तिने मृतदेह नष्ट करण्यासाठी विशालला मदत केली होती.