मुंबई(ज्ञानेश सावंत) : जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी होणार आहे. बेंगळुरूचा संघ तीन सामने जिंकून गुण तक्त्यात पाचव्या स्थानावर आहे तर राजस्थानचा संघ दोन सामने जिंकून सातव्या स्थानावर आहे. आजच्या सामन्यात राजस्थान व बेंगळुरू दोघांसाठी विजय आवश्यक आहे. परंतु दोघांची कामगिरी पाहता राजस्थानसाठी बेंगळुरू थोडा कठीणच आहे. बेंगळुरूचा आक्रमकपणा त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यात नक्कीच मदत करेल.
आता पर्यंत ज्यावेळी त्यांनी सामना जिंकला आहे त्यावेळी पहिली फलंदाजी घेऊन समोरच्या संघावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. या उलट परिस्थिती राजस्थान रॉयल्सची आहे ते धावांचा पाठलाग करताना अपयशी ठरत आहेत. गेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला शेवटी एका तेज गोलंदाजाची उणीव भासत होती. संदीप शर्मा शेवटच्या षटकात संघाला महाघडा गोलंदाज ठरत आहे.
राजस्थानला गोलंदाजाची रणनीती बदलण्याची गरज आहे. जोफ्रा आर्चर सोबत एका नव्या चेहऱ्याची क्रिकेट रसिक वाट पाहत आहेत. जोफ्रा आर्चरचा सुरवातीचा स्पेल बेगलूरूसाठी धोकादायक ठरू शकतो.
चला तर जाणून घेऊ या आयपीएल मधील आजच्या सामन्यात कोणत्या संघाची सरशी होणार