पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले
हिमवर्षावातही कांती तव पाहुनी
तारका नभातल्या लाजल्या मनातुनी
ओघळले हिमतुषार गालांवर थांबले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले
का उगाच झाकिशी नयन तुझे साजणी
सांगतो गुपीत गोड स्पर्श तुझा चंदनी
धुंदल्या तुझ्या मिठीत देहभान हरपले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले
मृदु शय्या टोचते, स्वप्न नवे लोचनी
पाहिलेस तू तुला आरशात ज्या क्षणी
रूप देखणे बघून नयन हे सुखावले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले
गीत : मधुसूदन कालेलकर
स्वर :सुरेश वाडकर
गंध हलके
कोणी हळूच यावे माझ्या मनी फुलावे
आणि ओंजळीत घ्यावे…
गंध हलके हलके हलके… गंध हलके…
स्वप्न ल्यायल्या नयनी चांद डोकावून जाई
तुझे चांदणे फुलावे धुंद हलके हलके
तुझ्या स्पर्शांनी फुलावे, सप्तसूर आर्त व्हावे
तार झंकारूनी यावे गीत हलके हलके…
माझ्या ओठीचे तराणे तुझ्या ओठांनी टिपावे
तप्त श्वास मंद व्हावे माझे हलके हलके
माझ्या हाती रंग यावे धुंद जाहल्या मेंदीचे
आणि गंध तूही ल्यावे आज हलके हलके…