शिलावरण आणि जलावरण
सभोवताली आहे वातावरण
नांदती सौख्यात सारे
सुखी होई पर्यावरण
तपांबर, स्थितांबर, दलांबर
महत्त्वाचे ओझोन आवरण
वायू प्रदूषण वाढता
धोक्यात येई वातावरण
भुरूपाचे शिलावरण
पर्वत, पठार आणि मैदान
जागोजागी झाडे लावून
हिरवाईने नटवू छान
महासागर, सागर,
आखात, खाडी
हे तर सारे जलावरण
दूषित पाणी नदीचे होता
बाधित होई आरोग्यधन
म्हणूनच सारे करू संकल्प
चला वाचवू जंगल, रान
ओसाड उजाड माळावरती
पुन्हा डोलू दे पान न् पान
काव्यकोडी – एकनाथ आव्हाड
१) पहाटेला पूर्वेकडून
हा हलकेच येतो
हळूहळू साऱ्या दिशा
लख्ख करत जातो.
दुपारच्या वेळी
दीपवतो डोळे
उगवणे, मावळणे
हे कोणामुळे कळे?
२) झाडाच्या खोडालाच
लटकतो मी फार
वजनदार फळ मी
दंडगोलाकार.
झारखंड म्हणतात
माझ्या आवरणाला
काटेरी अंग माझे
नाव काय बोला?
३) कधी धो-धो कोसळतो
कधी रिमझिम बरसतो
कधीकधी मी अगदी
वेड्यासारखा वागतो
झाडं शेती, रान
मलाच देती मान!
ओळखले का मला
मी फुलवतो पान न पान?
उत्तर –
१) सूर्य
२) फणस
३) पाऊस