नवी दिल्ली: भारताचा शेजारील देश म्यानमारमध्ये रविवारी सकाळी सकाळी भूकंपाचे जोरदार झटके बसले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ५.१ इतकी होती. दरम्यान, नुकत्याच आलेल्या भूकंपाने संपूर्ण देशाला उद्ध्वस्त केले होते. यात ३ हजार जणांचा मृत्यू झाला होता.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, म्यानमारमध्ये १३ एप्रिल २०२५च्या सकाळी ७ वाजून ५४ मिनिटांनी भूकंप आला. या भूकंपाची तीव्रता ५.१ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचे केंद्र जमिनीच्या आत १० किमी खोल होते. दरम्यान, या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झाल्याचे वृत्त नाही.
EQ of M: 5.1, On: 13/04/2025 07:54:58 IST, Lat: 21.13 N, Long: 96.08 E, Depth: 10 Km, Location: Myanmar.
For more information Download the BhooKamp App https://t.co/5gCOtjcVGs @DrJitendraSingh @OfficeOfDrJS @Ravi_MoES @Dr_Mishra1966 @ndmaindia pic.twitter.com/Fr8qprdNdt— National Center for Seismology (@NCS_Earthquake) April 13, 2025