मुंबई : अंधेरीतील मेट्रो स्थानक परिसरात राम नवमीच्या दिवशी काढलेल्या मिरवणुकीत अश्लील गाणी वाजवल्याप्रकरणी आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक रस्त्यांवर अशा प्रकारची गाणी वाजविल्याने अंधेरी विभागातील सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून राजेश बिडानिया, अमित पाठक आणि ओमकार दळवी अशी आयोजकांची नावे आहेत.
Barbie box trend goes viral : घिबली नंतर बाजारात आला AI डॉल ट्रेंड!
अंधेरी येथे राम नवमीच्या दिवशी मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. या मिरवणुकीत २०० ते २५० व्यक्तींचा समावेश होता. मिरवणूक कुर्ला मार्गावरून मरोळ नाक्याच्या दिशेने जात असताना महिलांचा अपमान होईल अशा शब्दरचना असणारी गाणी ध्वनिक्षेपकातून वाजविण्यात आली. त्यामुळे तीनही आयोजकांवर पोलिसांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला.