मुंबई : उद्धव गटाच्या उपनेत्या प्रवक्त्या संजना घाडी आणि त्यांचे पती माजी नगरसेवक संजय घाडी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत स्वागत केले. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्षवाढीसाठी सक्रीय व्हा, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घाडी पती पत्नी आणि त्यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सर्वांनाच केले. घाडी पती पत्नीसह मागाठाणे विधानसभेतील अनेक उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, शाखाध्यक्ष आणि युवा सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशासाठी माजी नगरसेवक राम रेपाळे यांनी विशेष प्रयत्न केले. उबाठातून झालेल्या आऊटगोईंग आणि शिवसेनेत झालेल्या इनकमिंगमुळे उद्धव गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
पक्ष प्रवेश सोहळा सुरू होता त्यावेळी तिथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विधान परिषद उपसभापती आणि शिवसेना नेत्या आमदार डॉ. निलम गोऱ्हे उपस्थित होत्या. शिवसेनेत प्रवेश करताच संजना घाडी यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. आता संजना घाडी या शिवसेनेच्या उपनेत्या आणि पक्ष प्रवक्त्या अशी दुहेरी जबाबदारी हाताळतील.
Mumbai water crisis : ऐन उन्हाळ्यात टँकर संघटनेचा संप, मुंबईकर चिंतेत
मुंबई : ऐन उन्हाळ्यात मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने (Mumbai Water Tanker Association or MWTA) संप पुकारला आहे. या संपामुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. भरमसाठ भूजल उपसा ...
घाडी पती पत्नीच्या पक्षप्रवेशावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मागील अडीच वर्षात सर्वसामान्यांना सोन्याचे दिवस आणण्याचे काम महायुती सरकारच्या माध्यमातून केले. एकीकडे विकास प्रकल्प आणि दुसरीकडे लोकाभिमुख योजना या दोघांची सांगड घालण्याचा प्रयत्न सरकारने केला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या निवडणुकीत ८० जागा लढवून ६० जागा जिंकलो तर कोणी १०० जागा लढवून २० जागा जिंकल्या, यावरुन खरी शिवसेना कोणाची यावर जनतेने शिक्कामोर्तब केले. त्यांच्या आरोपाला आरोपातून नाही तर कामातून उत्तर दिले.
बाळासाहेब म्हणायचे सत्ता येते, सत्ता जाते पण नाव जाता कामा नये, ते नाव टिकवण्याचे काम आपण केले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. बाळासाहेब आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकाऱण या विचारानुसार आपले सरकार काम करतेय, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.ते पुढे म्हणाले की, मुंबईत १५ ते २० वर्षांपूर्वी जी कामे व्हायला हवी होती ती आपण मागील अडीच वर्षात सुरु केली. मुंबईत अटल सेतु, कोस्टल रोड झाला. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु केला. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची विमा सुरक्षा १.५ लाखांवरुन ५ लाख केली. हे काम करणारे सरकार आहे. ही काम करणारी शिवसेना आहे. धनुष्यबाण ही आपली निशाणी आहे. धनुष्यबाण आणि भगवा झेंडा हे आपले इमान आहे, श्वास आहे आणि आपला अभिमान आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाने प्रभावित होत मूळ शिवसेनेत प्रवेश केला असे माजी नगरसेवक संजय घाडी यांनी पक्ष प्रवेशावेळी सांगितले.