Sunday, April 20, 2025
Homeक्रीडामाधव रानडे एक 'अनमोल रत्न'

माधव रानडे एक ‘अनमोल रत्न’

मुंबई  (केदार भावे) : गेल्या महिन्याभरात अनेक दिग्गज खेळाडूंचा वाढदिवस होऊन गेला, त्यातील क्रिकेट क्षेत्रातील एक नामवंत खेळाडू म्हणजे माधव रानडे. ज्यांनी नुकताच पंचाहत्तरीचा टप्पा पूर्ण केला. तसेच क्रिकेट या क्षेत्रात अनेक लहान-मोठ्या खेळाडूंनी आपल्या खेळाच्या जोरावर क्रिकेटप्रेमींच्या मनावर छाप उमटावली आहे. असेच सगळ्यांचे लाडके आणि क्रिकेटचे पुजारी म्हणून माधव रानडे यांची सर्वत्र ख्याती आहे. सर्वात प्रथम माधव रानडे यांना गोलंदाजी करताना पाहिले ते पीवायसीच्या जुन्या मैदानावर. तेव्हा भांडारकर सर हे पीवायसी मैदानावर प्रशिक्षण घेत असत. प्रत्येक फिरकी गोलंदाजाला ते “माधवची गोलंदाजीची आदर्श शैली” म्हणून दाखवीत असत. माधव गोलंदाजी करत असताना त्याच्या गोलंदाजीवर जवळ फिल्डिंग करणारे काही क्षेत्ररक्षक म्हणजे विनू द्रविड, भालचंद्र, सुरेंद्र आजही सांगतात की, त्याच्या चेंडूच्या फिरकीमुळे एक विशिष्ट आवाज येत असे आणि असा आवाज फक्त पूर्वीचे भारताचे फिरकी जादूगार बेदी, प्रसन्ना वेंकट यांच्याच गोलंदाजीच्या वेळीच येत असे.

Amir Khan : आमिर खान आणि जेनेलिया यांची जोडी ‘सितारे जमीन पर’मध्ये झळकणार

अनेकांच्या मते श्रेष्ठ गोलंदाजी करणारे रानडे ही एकमेव व्यक्ती. खुद्द गावसकर सुद्धा त्यांच्या गोलंदाजीचे कौतुक करत. हेमंत कानिटकर, राजू भालेकर, साळगावकर, यजुवेंद्र सिंग असे फार मोठे खेळाडू आपल्या महाराष्ट्राला लाभले, पण माधव त्या पैकीच एक आहे. माधवचे महत्त्व फक्त एवढेच नाही हों.. त्याचा बायोडाटा ही अत्यंत तगडा आहे. रणजी ट्रॉफी खेळल्या नंतर म्हणजे १९७८ पासून २०२० या ४२ वर्षे या कालखंडात ते व्यवस्थापकीय समितीचे मेंबर राहिलेले असून इतका मोठा कालावधी आजपर्यंत कोणाचाच नाही. तसेच पीवायसी क्लब चे सेक्रेटरी पद त्यांनी सलग १६ वर्षे भूषविलेले आहे. पीवायसी संघाने जे राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय खेळाडू भारताला दिले, त्यात माधव रानडे यांचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्राच्या रणजी ट्रॉफी संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष पद त्यांनी ३ वर्षे भूषविलेले आहे. त्यांनी बीसीसीआयतर्फे सलग ३ वर्षे मॅच रेफ्री म्हणून काम पाहिले आहे. त्यांचा अनुभव आणि काम करण्याची पद्धत पाहून २०१२ या वर्षी वेस्ट इंडिज दौऱ्यावर व्यवस्थापक म्हणून त्यांची वर्णी लागली होती. पुण्याच्या गेहूजे स्टेडियमचे काम २००३ साली सुरु होऊन २०१४ पर्यंत त्यांचे ११ वर्षे खजिनदारचे काम त्यांनीं चोख बजावले आहे. महाराष्ट्राच्या अनेक निवडणुका होऊन सुद्धा आलेल्या नवीन कमिटी मध्ये माधवचे कोणत्या ना कोणत्या पदावरचे स्थान हे ‘अढळ’ असे, कारण काही कर्तबगारी असल्याशिवाय असे घडत नाही हे मात्र अगदी खरे आहे. माधव तसा अबोल, काहीसा स्वतः च्या विचारांनी चालणारा असला तरी क्रिकेट क्षेत्रातील पारंगत असा ‘अनमोल रत्न’ आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -