पन्ना : वक्फ कायदा लागू झाल्यानंतरची पहिली कारवाई मध्य प्रदेशमधील पन्ना जिल्ह्यात करण्यात आली. पन्ना जिल्ह्यात असलेला एक अनधिकृत मदरसा पाडण्यात आला. पन्ना जिल्ह्यातील बीडी कॉलनी येथे सरकारच्या जागेवर हा अनधिकृत मदरसा मागील ३० वर्षांपासून होता. अखेर वक्फ कायदा झाल्यानंतर हा अनधिकृत मदरसा पाडण्यात आला.
मदरशाला अनधिकृत असल्यामुळे काही वर्षांपूर्वी नोटीस बजावण्यात आली होती. पण नंतर कोणतीही कारवाई झाली नव्हती. अखेर आता वक्फ कायदा झाल्यानंतर हा अनधिकृत मदरसा पाडण्यात आला.
आधी ग्रामपंचायत होती त्यावेळी सरकारी जमिनीवर अनधिकृतरित्या बांधलेल्या मदरशाला परवानगी मिळाली नव्हती. नंतर महापालिका झाली त्यावेळीही मदरशाला परवानगी मिळाली नव्हती. यामुळेच अनधिकृत मदरशाला नोटीस बजावली होती. अखेर आता हा अनधिकृत मदरसा पाडण्यात आला.