Wednesday, April 16, 2025
Homeक्रीडाIPL 2025DC vs MI, IPL 2025: मुंबईला जिंकण्याची संधी!!!

DC vs MI, IPL 2025: मुंबईला जिंकण्याची संधी!!!

मुंबई(ज्ञानेश सावंत): मुंबईचा संघ दिवसेंदिवस रसातळला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या पाच पैकी फक्त एकच सामना मुंबईने जिंकला आहे. मुंबईला ह्या हंगामात ना धावांचा पाठलाग करता येत आहे ना पहिली फलंदाजी घेऊन चांगली धावसंख्या उभारता येत आहे. मुंबईचा संघ धावांचा पाठलाग करताना थोडा कमी पडत आहे. मागील दोन्ही सामने त्यांनी फक्त १२ धावांनी गमावले आहेत. त्यांची सलामीची जोडी संघासाठी भक्कम सुरवात करून देण्यात अपयशी ठरत आहे. रोहितला थोडे संयमाने खेळावे लागेल, आज मुंबई संघाला त्याच्या संयमी खेळाची गरज आहे.

मुंबईला गोलंदाजीवरही लक्ष द्यावे लागणार आहे. आज त्यांच्या समोर ह्या हंगामातील सर्वोत्तम संघ खेळणार आहे त्यामुळे मुंबईला फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर चांगली कामगिरी करावी लागेल. मुंबईसाठी डोकेदुखी असेल ते मिचेल स्टार्कचा सुरवातीचा स्पेल, तो त्यांना संयमाने खेळून काढावा लागेल, अथवा त्याला आक्रमकपणे उत्तर द्यावे लागेल.

मुंबईकडे आक्रमकपणा आहे पण तो ह्या हंगामात अजूनही दिसून आलेला नाही. कदाचित ह्याला कर्णधार जबाबदार असू शकतो. मुंबईकडे जमेची बाजू म्हणजे बुमराहचे आगमन, बुमराह आज संघासाठी संजीवनी बुटीचे काम करू शकतो. तस झाल तर मुंबईच्या संघात एक चैतन्य निर्माण होईल. दिल्लीसाठी बुमराहचा स्पेल खेळणे कठीणच आहे.

मुंबईचा आज पर्यंतचा इतिहास आहे की जेव्हा अशक्य असते तेव्हाच कठीण परिस्थितीत खेळून ते शक्य करून दाखवतात. आज असच काहीतरी होईल अशी अपेक्षा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -