मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बापट पुन्हा एकदा बॉलिवूड प्रेक्षकांना भुरळ घण्यासाठी सज्ज झाली आहे.ती लवकरच एक हिंदी सिनेमातून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. ज्यात ती प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्यासोबत झळकणार आहे.
प्रियानं सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. तिने आगामी चित्रपटाचे पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केल आहे. 'कोस्टाओ' (Costao) असं चित्रपटाचं नाव आहे. यामध्ये ती बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत दिसणार आहे. चित्रपटात नवाजुद्दीन कस्टम ऑफिसरच्या भूमिकेत आहे. तर प्रियाची भुमिका नेमकी कोणती आहे, हे उघड झालेलं नाही. हा चित्रपट 'ZEE5' वर प्रदर्शित होणार आहे. प्रियाच्या या नव्या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही.
'कोस्टाओ' या चित्रपटाचे दिग्दर्शन सेजल शाह यांनी केले आहे. हा एक क्राईम थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा धाडसी कस्टम अधिकारी कोस्टाओ फर्नांडिस यांच्या जीवनापासून प्रेरित आहे. १९९० च्या दशकात कोस्टाओ फर्नांडिस यांनी आपल्या धाडसी मोहिमेद्वारे भारतात सोन्याची तस्करी करण्याचा सर्वात मोठा प्रयत्न यशस्वीरित्या उधळून लावला. त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक तस्करीचे प्रयत्न रोखले होते. या चित्रपटात कोस्टाओ फर्नांडिसच्या आयुष्यात घडलेल्या रोमांचक आणि नाट्यमय घटना दाखवल्या जातील.






