मुंबई : बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या आपल्या आगामी चित्रपट ‘सितारे जमीन पर’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच या चित्रपटातील एका खास गाण्याचे शूटिंग करण्यात आले असून, या चित्रपटात आमिरसोबत अभिनेत्री जेनेलिया डिसोझा देखील पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे गाणे एका अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी क्षणावर आधारित आहे. आमिर आणि जेनेलिया यांच्यातील केमिस्ट्री या गाण्याच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे.
Barbie box trend goes viral : घिबली नंतर बाजारात आला AI डॉल ट्रेंड!
या गाण्याचे चित्रीकरण अत्यंत भव्य पद्धतीने करण्यात आले असून, यामध्ये मुलांशी संबंधित एक भावनिक कथा गुंफलेली आहे. ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट २००७ मध्ये आलेल्या आमिर खानच्या ‘तारे जमीन पर’ या हृदयस्पर्शी चित्रपटाचा पुढचा भाग असणार आहे. नव्या चित्रपटातही शिक्षण, मानसिक आरोग्य, आणि मुलांच्या भावविश्वावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. यावेळी आमिर खान एका प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार असून, तो विशेष मुलांना मार्गदर्शन करताना दिसेल.