अमरावती : आष्टगाव ते खानापूर मार्गावर भीषण अपघात (Accident News) झाल्याचे समोर आले आहे. मोर्शीच्या दिशेने जाणाऱ्या एका मालवाहू बोलोरो पलटी होऊन आज मोठा अपघात घडला आहे. यामध्ये १ जणाचा जागीच मृत्यू झाला असून ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात होताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली असून जखमींना अमरावती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Tanker Price Hike : वाढत्या उन्हात दरवाढीचा चटका! टँकरच्या शुल्कात ५ टक्के वाढ
एचजी इन्फो स्ट्रक्चरचे १० मध्य प्रदेशातील मजूर चांदूर बाजार येथील एच जी च्या प्लांट वरून मोर्शी कडे घेऊन जात असताना खानापूर ते आष्टगाव जवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने मालवाहू पिकअप क्रमांक एम एच २७ एक्स ८६०१ पलटी होऊन एक मजूर घटनास्थळी ठार झाला तर ९ मजूर जखमी झाले. दरम्यान घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या मदतीने पिकअप खाली दबलेल्या मजुराला मालवाहू पिकअप सरळ करून अन्य ९जखमींना बाहेर काढले. या अपघातात मध्य प्रदेशातील राकेश पाटील वय २२ वर्ष हा घटनास्थळी ठार झाला. (Accident News)
जखमींची माहिती
पप्पू काजदे (२०), राजा काजळे यांना गंभीर मार असल्यामुळे पुढील उपचारासाठी अमरावती रवाना करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अन्य जखमींची नावे मुजा कासदे, सुनील कासदे, रंगभाऊ श्रीपाद यादव, सालक राम सालवे, लालसिंग कासदे, अर्जुन चिराले ही सर्व जखमींची नावे आहेत. गंभीर जखमींवर मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉ. सचिन कोरडे यांनी उपचार केले. वृत्तलिहे पर्यंत पोलिसात तक्रारीची नोंद नाही. अधिक तपास मोर्शी पोलीस करीत आहे.