Saturday, April 19, 2025
Homeसाप्ताहिककोलाजकृतार्थ जीवन

कृतार्थ जीवन

मनस्विनी – पूर्णिमा शिंदे

मानवाला परमेश्वरी लाभलेली देणगी आणि वरदान म्हणजे जीवनदान. जगता जगता जीवन आनंदाने जगण्याची गोष्ट आहे. यश-अपयश, सुख-दुःख, हार-जीत हेच तर जीवन. जीवन ही चैनीची वस्तू नसून कर्तव्याची भूमी आहे.

सुळासाठी छाती पुढे केल्याशिवाय मुकुटासाठी मस्तक पुढे करता येत नाही. रवींद्रनाथ टागोर म्हणतात की, आपले जीवन हे आपणास मिळालेले अनमोल असे दान आहे. त्याचे दान करीत राहिल्यानेच मोल वाढते तर महात्मा गांधी म्हणतात, “जीवनाचे कमळ फुलविण्यासाठी कष्टाचा चिखल तुडवावा लागतो”. आए है इस दुनिया में आए है तो जीनाही पडेगा, जीवनही एक जहर तो पिनाही पडेगा. एकदा एका शिष्याने गुरूला विचारले जीवनाचे सार्थक होण्यासाठी आपण काय केले पाहिजे. तेव्हा गुरू म्हणाले, नि:स्वार्थ बुद्धीने जनसेवा करावी. इतरांचे अश्रू पुसावेत. तहानलेल्यास पाणी द्यावे, भुकेल्यास अन्न द्यावे आणि रंजल्या गांजले यांची सेवा करावी. त्यांना हवी तितकी मदत करावी आणि शिष्याला ते पटले. ज्ञानी याचा राजा संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून आपले जीवन दीपस्तंभांनी उजळले आणि इतरांचे मार्गदर्शक ते बनले. हेच जीवनाचे सार्थक आणि जनसेवा ही ज्ञानार्थ कृतार्थ व्हावी याकरता पसायदान होऊन जगावे हा कानमंत्र त्यांनी दिला. जगद्गुरू तुकोबाराय यांनी जनकल्याणासाठी झोकून घेतले. सर्वस्वाचा त्याग केला. तन-मन-धन अर्पण केले.

स्वतःच्या जीवनाचे सोने केले. साक्षात वैकुंठातून परमेश्वराचे विमान त्यांना घेण्यासाठी आले होते. हे कृतार्थ जीवन मदर तेरेसा, हेलन केलर, बाबा आमटे, सिंधुताई सपकाळ, डॉ. कलाम, रतन टाटा यांनीही रंजल्या गांजल्यांना सेवेद्वारे आपल्या जीवनाची पौर्णिमा कृतार्थ केली. देशसेवेसाठी आनंदाने सीमेवर लढणारे सैनिक जवान धारातीर्थी पडतात. देश सेवार्थ लढता लढता मृत्यूला कवटाळतात ते मरण नसून ते शहीद होणं. ती महती त्यांच्या आयुष्य सार्थक होते.

शेतात राबराब राबणारा बळीराजा, अन्नदाता असंख्य लोकांचे जेव्हा अन्न पिकवितात, हजारोंचा पोशिंदा हे सुद्धा सत्कर्म आहे. वसा आणि वारसा आहे. अनाथांचे नाथ बनून दिव्यांग, अपंग, गतिमंद, अनाथ, निराधारांचे शोषितांचे आधारस्तंभ होणं ही सुद्धा आजच्या काळाची गरज आहे. तरच आपण आपल्या जीवनामध्ये जन्माला येऊन आपली जीवन बाग फुलवावी. हीच जीवन सफलता इतरांच्या चेहऱ्यावर येणारे हास्य मधुरता, संवेदनशीलता हे आयुष्याचे सार्थक आहे. आयुष्याचे सोनं करायचं असेल तर दुःखी, कष्टी माणसांना वेळोवेळी मदतीचा हात द्या, त्यांचे मायबाप होता आलं पाहिजे. संतमहंतांनी आपल्याला हीच शिकवण दिली. त्यांची प्रेरणा, भावना, सत्कार्य, सत्कर्म अंगी करावीत. आपल्याला देखील संवेदनक्षम, सहिष्णू आणि सत्कार्यपूर्ण जगता आले पाहिजे.

‘जगा आणि जगू द्या’ या उप्तीप्रमाणे सर्वांसाठी खारीचा वाटा तरी उचलता आला पाहिजे. त्यांचे जीवन उजळता आले पाहिजे. हीच आहे जीवनाची कृतार्थ पौर्णिमा…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -