ठाणे : सिडकोच्या मालकीची नेरूळ, सीवूड्स प्लॉट नं. ३, ६, ७ सेक्टर 52ए येथील जागा भूखंड वाटपाद्वारे मेयर्स टूडे रॉयल डेव्हलपर्स यांना देण्यात आली होती. या जागी त्यांच्यामार्फत जेसीबीच्या सहाय्याने विविध प्रकारची १०० झाडे मुळासकट तोडण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. तसेच ही झाडे तोडण्याकरिता सिडकोकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नसल्याचे सिडकोच्या अधिकाऱ्यांमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
https://prahaar.in/2025/04/13/which-team-is-at-which-position-in-the-ipl-2025-points-table/
या भूखंडावर अनधिकृतपणे झालेल्या वृक्षतोडी विरोधात नवी मुंबई महापालिकेमार्फत येथे जाऊन दोन जेसीबी ताब्यात घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यानुषंगाने या जमिनीवरील कांदळवन बफरझोन क्षेत्रामध्ये अवैधरीत्या वृक्षतोड केल्याप्रकरणी संबंधित विकासक/ठेकेदार यांच्याविरुद्ध पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ मधील कलम १५ (१) अन्वये एनआरआय सागरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती प्रांताधिकारी उर्मिला पाटील व तहसिलदार उमेश पाटील यांनी दिली आहे.