पुणे : फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थी (फॉर्म नं. १७) म्हणून पात्र असूनही दिलेल्या मुदतीत नावनोंदणी अर्ज सादर करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी नावनोंदणीची संधी बोर्डाकडून मिळणार आहे.
त्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मंगळवार (दि.१५) पासून या नावनोंदणीला सुरूवात होणार आहे.दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांनी सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये मंडळाच्या अटी शर्तीनुसार नावनोंदणी करण्यासाठी उपलब्ध आहेत. याबाबत मार्गदर्शक पुस्तिका मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.
अधिक माहितीसाठी सर्व विद्यार्थी, शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या कार्यकक्षेतील विभागीय मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी केले.