Tuesday, April 29, 2025

क्रीडाताज्या घडामोडीIPL 2025

IPL 2025 : लखनऊ गुजरातची घोडदौड थांबवेल का?

IPL 2025 : लखनऊ गुजरातची घोडदौड थांबवेल का?

ज्ञानेश सावंत 

सध्या गुण तक्त्यात अव्वल स्थानी असलेल्या गुजरातचा संघ आज लखनऊ संघाशी त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. आतापर्यंत गुजरात पाच सामन्यांपैकी चार सामने जिंकून पहिल्या स्थानावर आहे, तर लखनऊ पाच पैकी तीन सामने जिंकून पाचव्या स्थानावर आहे. दिवसेंदिवस गुजरातची फलंदाजी बहरत चालली असून त्यांचे आघाडीचे फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत व सातत्याने त्यांच्याकडून चांगली फलंदाजी केली जात आहे. आजच्या सामन्यात फलदाजांची ऑरेंज कॅपसाठी शर्यत लागणार आहे. सध्या या शर्यतीत तीन फलंदाज आहेत ज्यापैकी दोन लखनऊचे, तर एक गुजरातचा आहे. निकोलस पूरन २८८ धावा करून ऑरेंज कॅपचा मानकरी आहे, तर त्यामागून २७३ धावा साई सुदर्शनच्या खात्यात आहेत, तर २६५ धावा जमवून मिचेल मार्श तिसऱ्या स्थानावर आहे.

आजच्या सामन्यात या तिघांपैकी जो जास्त धावा करेल तो ऑरेंज कॅपचा मानकरी ठरेल. तसेच आजच्या सामन्यात गुजरातचेच वर्चस्व असेल कारण म्हणजे सध्याचा गुजरातचा फॉर्म अतिशय उत्तम असून लखनऊ विजयी होण्याची संधी कमी असून लखनऊला त्यांच्या गोलंदाजीवर जास्त मेहनत घ्यावी लागेल. त्याचप्रमाणे लखनऊच्या कर्णधाराला अजूनही सूर गवसलेला नाही. त्यामुळे लखनऊसाठी हा सामना जिंकणे कठीणच दिसते आहे.

Comments
Add Comment