मुंबई : युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआय ठप्प झाले आहे. यामुळे थेट बँक खात्यामार्फत होणारे आर्थिक व्यवहार बंद झाले आहेत. गूगल पे, फोन पे आणि पेटीएम यांच्यासह अनेक अॅपचा यूपीआय प्लॅटफॉर्म बंद पडला आहे. यामुळे मोबाईलद्वारे झटपट आर्थिक व्यवहार करण्याची सवय झालेल्यांची पंचाईत झाली आहे. दुपारी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआय यांनी त्यांच्या अधिकृत हँडलवरुन एक्स पोस्ट करुन यूपीआय ठप्प असल्याचे जाहीर केले.
Devendra Fadnavis : ‘छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून लोटावं असं वाटतं, पण…’
NPCI is currently facing intermittent technical issues, leading to partial UPI transaction declines. We are working to resolve the issue, and will keep you updated.
We regret the inconvenience caused.
— NPCI (@NPCI_NPCI) April 12, 2025
यूपीआय ठप्प झाल्यामुळे ऑनलाईन आर्थिक व्यवहार करणाऱ्यांचे हाल होत आहेत. सर्व ऑनलाईन आर्थिक व्यवहार बंद आहेत. दुपारपासून देशभरातून मोठ्या संख्येने तक्रारी येण्यास सुरुवात झाली आहे. ऑनलाईन आर्थिक व्यवहार खोळंबल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. तंत्रज्ञ परिस्थिती सुरळीत करण्यात गुंतले आहेत. याआधी काही दिवसांपूर्वी थोड्या वेळासाठी यूपीआय ठप्प झाले होते. अवघ्या काही दिवसांत दोन वेळा यूपीआय ठप्प झाल्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.