Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीDahanu Traffic Jam : डहाणू तालुक्यात वाहतूक कोंडीची समस्या ‘जैसे थे’!

Dahanu Traffic Jam : डहाणू तालुक्यात वाहतूक कोंडीची समस्या ‘जैसे थे’!

वाहतूक पोलिसांकडून केवळ आश्वासनाची बोळवण

तलासरी : डहाणू तालुक्यात (Dahanu) वसलेले महालक्ष्मी मंदिर (Dahanu Mahalaxmi Mandir) हे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या या मंदिरात वर्षभर भाविकांची गर्दी असते, मात्र हनुमान जयंतीपासून (Hanuman Jayanti 2025) सुरू होणाऱ्या यात्रा काळात हीच गर्दी मोठ्या प्रमाणात वाढते. यात्रा काळात नियमितपणे लाखो भाविक दर्शन व यात्रेचा आनंद घेण्यासाठी येत असतात. यावर्षी १२ एप्रिलपासून यात्रेला सुरुवात होत असून, पुढील पंधरा दिवस हा यात्रा उत्सव चालणार आहे; परंतु महालक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या येणाऱ्या सेवा रस्त्यांचे काम अपूर्ण असल्याने यात्रा काळात महामार्गावर वाहतूक कोंडी होणार आहे. (Dahanu Traffic Jam)

Gold Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! सोन्याच्या दरात २ हजार रुपयांची वाढ

महालक्ष्मी यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी व यात्रेचा आनंद घेण्यासाठी गर्दी करतात. केवळ पालघर जिल्हाच नव्हे, तर मुंबई, ठाणे, नाशिक, गुजरात, राजस्थान येथूनही भाविक मोठ्या संख्येने दाखल होतात. या पार्श्वभूमीवर डहाणू ते चारोटी दरम्यान वाहतूक सुरळीत राहावी यासाठी वेगळ्या उपाययोजना अपेक्षित असतात. मात्र यंदाही प्रशासनाकडून कोणतीही ठोस तयारी करण्यात आलेली नसल्याचे चित्र आहे. चारोटी ते महालक्ष्मी मंदिर दरम्यानचा सेवा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. यावर्षीही हा रस्ता पूर्ण न झाल्याने भाविकांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे. विशेषतः चारोटी येथील उजवा तीर कालवा ओलांडण्यासाठी पूल न झाल्यामुळे हा रस्ता वापरणे अशक्य होते. शिवाय, चारोटी उड्डाणपुलाखाली गर्दी वाढल्याने वाहनचालक अनेकदा विरुद्ध दिशेने जाण्याचा धोका पत्करतात, ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. (Dahanu Traffic Jam)

महालक्ष्मी यात्रेच्या काळात डहाणू बस डेपोमार्फत विशेष बसेस चालवण्यात येतात. त्याचबरोबर भाविक आपल्या खासगी वाहनांद्वारे देखील मोठ्या संख्येने येतात. यामुळे महामार्गावर दुचाकी, रिक्षा, कार, प्रवासी वाहने यांची प्रचंड गर्दी होते. दरवर्षी जसे अपघाताचे प्रमाण वाढते, तसेच याहीवर्षी महामार्ग प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. भाविकांचा जीव धोक्यात घालणारी ही परिस्थिती असताना देखील महामार्ग प्राधिकरण व वाहतूक पोलिसांकडून केवळ प्रतिवर्षीची हमी-खात्री सुरूच आहे. त्यामुळे स्थानिक वाहनचालकांनी व ग्रामस्थांनी सेवा रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी केली आहे. (Dahanu Traffic Jam)

महालक्ष्मी मंदिर परिसरातील सेवा रस्त्यांचे काम यात्रा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात्रा काळात भक्तांना व महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये यासाठी नियोजन सुरू आहे.
– सुहास चिटणीस ( महामार्ग प्राधिकरण )

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -