काय आहेत इतर शहरातील दर
मुंबई : सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असून गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात (Gold Rate) घसरण पाहायला मिळाली होती. त्यामुळे सोनं खरेदीरांना सोनं खरेदीसाठी काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा एकदा सोन्याच्या दराने तेजी (Gold Price Hike) घेतली आहे. घसरणीनंतर सोन्याच्या दरात २ हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. (Gold Rate Today)
Nashik Crime : नाशिकमध्ये सैन्याच्या लेखा विभागातील प्रशासकांनी केला आर्थिक घोटाळा, CBI ची कारवाई
आज जाहीर झालेल्या सोन्याच्या दरानुसार २४ कॅरेट सोन्याच्या दरात २ हजार २० रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ९५ हजार ५५० रुपये इतकी आहे. तर ८ ग्रॅम सोनं ७६ हजार ४४० रुपये इतका आहे. तसेच १ ग्रॅम सोनं ९ हजार ५५५ रुपयांनी विकले जात आहे. (Gold Rate Today)
इतर शहरांमध्ये आज सोन्याचा भाव
मुंबई, पुणे, जळगाव, नागपूर, अमरावती, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, वसई-विरार, नाशिक, भिवंडी या शहरांत २२ कॅरेट सोन्याचे दर ८ हजार ४५ रुपये आणि २४ कॅरेट सोन्याचे दर ९ हजार ५४० रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
चांदीचे दर काय?
चांदीच्या दरातही आज १०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यानुसार एक किलो चांदीची किंमत आज ९७ हजार १०० रुपये इतकी झाली आहे. (Silver Rate Today)