

Mumbai : मुंबईतील सोडियम व्हेपरचे ९५ टक्के दिवे बनले एलईडीचे
आतापर्यंत १ लाख ३६ हजार ३७० एलईडी बनवले मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील पथदिव्यांच्या उभारणी करताना सोडियम व्हेपरच्या दिव्यांचे रुपांतर एलईडीचे ...
निर्णयानुसार आता शाळेच्या आवा रात विद्यार्थ्याने शिवी दिली तर त्याच्या पालकांना दंड भरावा लागणार आहे. या दंडाच्या भीतीने मुलं जपून बोलतील आणि शिव्या देणं टाळतील, असा विचार निर्णय घेण्यामागे आहे. मुलांनी शिव्या न देता एकमेकांचा मान राखून बोलावे. माणसाला माणसासारखे वागवावे. कळत नकळतही कोणाचा अपमान करू नये या हेतूने बदलापूरच्या शाळांनी शिवी हद्दपार करण्याचा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. बदलापूरच्या आदर्श शाळेत मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या कार्यशाळेतून या मोहिमेला सुरुवात झाली आहे. टीव्ही आणि मोबाईलच्या विश्वात रमलेल्या मुलांचा पालकांशी अतिशय कमी संवाद होत आहे. मुलांच्या रोजच्या वर्तनाकडे सतत लक्ष ठेवणे पालकांना शक्य होत नाही. त्यामुळ शिवी हद्दपार सारखा विद्यार्थ्यांना चांगली शिकवण देणारा, त्यांच्यावर उत्तम संस्कार करणारा उपक्रम शाळांतून राबवण्यास सुरुवात झाली आहे.
शाळांच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांची भाषा सुधारण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांच्या तोंडून शिव्या ऐकू येणार नाहीत. एक सुजाण पिढी घडवण्यास मदत होईल, असा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केला आहे.