Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीमुंबईतील विहीर मालकांना  महानगरपालिकेकडून बजावण्यात आलेल्या सूचनापत्रांना  १५ जून २०२५ पर्यंत स्थगिती

मुंबईतील विहीर मालकांना  महानगरपालिकेकडून बजावण्यात आलेल्या सूचनापत्रांना  १५ जून २०२५ पर्यंत स्थगिती

केंद्रीय भूजल प्राधिकरणाकडून ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ प्राप्त करण्याची ‘भू-नीर’ ही ऑनलाईन प्रणाली अधिक सुलभ करुन जनजागृती करावी

केंद्रीय जलशक्ती मंत्री चंद्रकांत पाटील यांचे केंद्रीय भू-जल प्राधिकरण प्रशासनाला निर्देश

मुंबई (खास प्रतिनिधी) : केंद्रीय भू-जल प्राधिकरणाचे बदललेले नियम व त्यापार्श्वभूमीवर यादृष्टिने मुंबईतील टँकरचालकांच्या मागण्या व त्यांचा संप यावर तातडीने तोडगा काढावा. कारण मुंबईतील नागरिकांना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये,  याची काळजी घेण्याची सूचना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेला केली आहे.
तसेच, केंद्रीय भू-जल प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार खासगी विहीर व कूपनलिका धारकांनी भूजल उपसा करण्यासाठी ‘भू-नीर’ या ऑनलाईन एक खिडकी प्रणालीवरुन ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. मात्र, त्यामध्ये नागरिकांना येत असलेल्या अडचणी पाहता ही प्रणाली अधिक सुलभ करण्याचे व त्याविषयी जनजागृती करण्याचे निर्देश  केंद्रीय जलशक्ती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय भू-जल प्राधिकरण प्रशासनाला दिले आहेत.
या दोन्ही निर्देशांच्या अनुषंगाने, मुंबई महानगरपालिकेने बजावलेल्यासूचनापत्रांना येत्या  १५ जून २०२५ पर्यंत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक  भूषण गगराणी यांनी स्थगिती दिली आहे.दरम्यान,मुंबई महानगरपालिकेने सूचनापत्रांना येत्या १५ जून २०२५ पर्यंत स्थगिती दिली आहे, असे असले तरी, विहीर व कूपनलिकांसाठी तसेच भू-जल उपशासाठी आवश्यक त्या सर्व परवानगी प्राप्त करणे बंधनकारक राहील, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.
केंद्रीय भू-जल प्राधिकरण यांनी नवीन नियमावली लागू केली आहे. या नियमावलीनुसार सर्व विहीर तसेच कूपनलिका धारकांनी केंद्रीय भू-जल प्राधिकरण यांचे ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ प्राप्त करावे, या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईतील विहीर व कूपनलिका मालकांना सूचनापत्र बजावण्यात आले होते. तथापि या सूचनापत्रानंतर पाणी उपलब्धतेमध्ये अडचणी येऊ लागल्याने टँकर चालक संघाने संप पुकारला होता.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, माननीय केंद्रीय जलशक्ती मंत्री  चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील टँकर चालक आणि केंद्रीय भू-जल प्राधिकरण प्रशासन आदींच्या उपस्थितीत वांद्रे-कुर्ला संकुलात शुक्रवारी ११ एप्रिल २०२५ रोजी बैठक पार पडली. या बैठकीस आमदार  प्रवीण दरेकर यांच्यासह मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा, कीटकनाशक अधिकारीचेतन चौबळ व इतर संबंधित यंत्रणाचे अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी टँकर चालक संघटनेचे म्हणणे केंद्रीय जलशक्ती मंत्री  पाटील यांनी ऐकून घेतले. तसेच सर्व संबंधित अधिकाऱयांनी देखील प्रशासकीय माहिती सादर केली.  सविस्तर चर्चेनंतर, माननीय केंद्रीय जलशक्ती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय भू-जल प्राधिकरणाला निर्देश दिले की, ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ प्राप्त करण्यासाठी उपलब्ध असलेली एक खिडकी प्रणाली ‘भू–नीर’ ही अधिक सुलभ करावी. तसेच या प्रणालीविषयी जास्तीत जास्त जनजागृती करावी. त्याचप्रमाणे ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ प्राप्त करण्यासाठी नागरिकांना येणाऱया अडचणी सोडविण्याकरिता केंद्रीय भू-जल प्राधिकरणाच्या अधिकाऱयांनी सहाय्य पुरवावे, असे निर्देशही मंत्री यांनी दिले आहेत.
त्याचप्रमाणे, राज्याचे  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनीही ल मुंबईतील टँकरचालकांच्या मागण्या व संप या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेला निर्देश दिले आहेत की, ‘मुंबईतील टँकरचालकांचा संप सुरु असल्याने काही भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. उन्हाळ्याचा काळ पाहता ही स्थिती अशीच राहणे योग्य नाही. त्यामुळे बदललेले नियम आणि टँकरचालकांच्या मागण्या यातून सुवर्णमध्य साधत, सामान्य जनतेला त्रास होणार नाही, यादृष्टीने तातडीने तोडगा काढावा.’
या निर्देशांचा विचार करता, मुंबईतील विहीर आणि कूपनलिका धारकांना मुंबई महानगरपालिकेने बजावलेल्या सूचनापत्रांना येत्या १५ जून २०२५ पर्यंत स्थगिती देण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे, यानिमित्ताने विहीर व कूपनलिकांना परवानगी देण्याविषयीची मुंबई महानगरपालिकेची प्रणाली देखील अधिक सुलभ, सोपी करावी, असे निर्देशही गगराणी यांनी दिले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -