उन्हाचा चटका बसण्यास सुरुवात झाली आहे. उन्हाळ्यात उन्हाच्या तडाख्यापासून त्वचेचं संरक्षण कसं करावं ही एक मोठी चिंता असते. उन्हाळ्यात तुमच्या आरोग्यासह त्वचेची सुद्धा विशेष काळजी घेणं फार महत्त्वाचे आहे. वाढत्या उष्णतेमुळे त्वचा डिहायड्रेट होऊ शकते, ज्यामुळे मुरुमे, सनबर्न आणि पुरळ यांसारख्या समस्या वाढू शकतात. मात्र असं सगळं जरी असलं तरी त्वचेची योग्य काळजी घेतली गेली तर या सर्व समस्यांपासून सुटका मिळू शकते. उन्हाळ्यात सूर्यप्रकाशामुळे अनेकवेळा टॅनिंगच्या समस्या उद्भवतात. टॅनिंगमुळे तुमची त्वचा काळपट होते. उन्हाळा येताच, सूर्याच्या तीव्र किरणांमुळे आपल्या त्वचेचे नुकसान होते, ज्यामुळे त्वचा काळी आणि टॅन होते. उन्हात बाहेर पडायचं म्हणजे चेहरा झाकणं, गॉगल्स घालायचे आणि सूर्यापासून रक्षण करायचं असे सर्वत्र प्रयत्न सुरू होतात. मात्र तरीही यामुळे त्वचा पूर्णपणे सुरक्षित नसते. अनेकजण शरीरावरील टॅनिंग दूर करण्यासाठी पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करतात. पण जास्त घाबरू नका, तुमच्या त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यासाठी येथे काही सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय आहेत.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चेहरा अधिक तेलकट होऊ लागतो. नॉर्मल त्वचा असलेल्यांची त्वचा देखील या दिवसांमध्ये तेलकट होऊ लागते अशा वेळी ऑईली स्किन असलेल्यांसाठी तर खूप मोठी अडचण निर्माण होते. यासाठीच उन्हाळ्याच्या दिवसांसाठी तुमची त्वचा स्वच्छ करण्यासाठी योग्य फेसवॉश निवडणं गरजेचं आहे.
दिवसातून चेहरा ४-५ वेळा धुणे गरजेचं आहे जेणेकरून त्वचा उजळण्यास मदत होईल.
त्वचेला स्वच्छ ठेवण्यासोबतच ती हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. उन्हाळ्यात त्वचा चमकदार ठेवण्यासाठी, दिवसभरात ८-१० ग्लास पाणी प्या आणि नारळपाणी, ताक आणि फळांनी भरलेले डिटॉक्स वॉटर देखील प्या, जेणेकरून शरीर आतून हायड्रेट राहील. तसंच काही फळांचा फेस पॅकलावूनही त्वचा हायड्रेट राहू शकते.
त्वचा तेलकट होत असल्याने या काळात त्वचेवर घाण, घाम, तेल आणि धूळ तयार होते. ज्यामुळे त्वचेची छिद्रे बंद होतात आणि मुरुमांची समस्या वाढू शकते. यासाठी वेळोवेळी चेहरा स्क्रब करणं गरजेचं आहे. डेड सेल्स काढण्यासाठी तुम्ही काही घरगुती एक्सफोलिएटचा वापर करू शकता.
उन्हाळ्यासाठी सनस्क्रिन हा अतिआवश्यक आहे. यामुळे सूर्याच्या यूव्ही किरणांपासून त्वचेचं संरक्षण होतं. तुमच्या त्वचेप्रमाणे सनस्क्रीन निवडणं गरजेचं आहे. तसंच सनस्क्रीन हे किमान ३० SPF क्षमता असलेलं तरी असावं. घरातून बाहेर निघण्यापूर्वी किमान २० मिनिट आधी ते लावावं. जर तुम्ही जास्त वेळ उन्हात बाहेर राहणार असाल. तर अशावेळी सतत घाम येऊ शकतो. त्यामुळे शक्य झाल्यास काही तासांनी पुन्हा चेहरा धुवून सनस्क्रिन लावल्यास जास्त फायदा होईल.
टोनर त्वचेच्या पीएचचे संतुलन राखण्यास मदत करते. उन्हाळ्यात, गुलाबपाणी, काकडीचा रस किंवा कोरफडीचा रस असलेले टोनर वापरा, जे त्वचेला हायड्रेट ठेवू शकतात.
उन्हाळ्यातही त्वचेला मॉइश्चरायझ करणे खूप महत्त्वाचे आहे. पाण्यावर आधारित, जेल-आधारित किंवा हायल्यूरॉनिक अॅसिड असलेले हलके मॉइश्चरायझर वापरा, जे त्वचेला चिकट न बनवता खोलवर पोषण देतील.
तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये सिझनल फळं आणि भाज्यांच्या समावेश करणं फार गरजेचं आहे. त्वचेला बाहेरून पोषण देण्यासोबतच आतून पोषण मिळणं देखील तितकचं गरजेचं आहे. यासाठी फळं आणि भाज्या हा चांगला पर्याय आहे.
नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय! नाशिक :…
नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…
निरोगी त्वचा असणे ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र, निरोगी आणि सुंदर दिसणाऱ्या त्वचेची योग्य काळजी…
पुणे : चितळे प्रकरण ताजे असतानाच पुण्यामध्ये ब्रँडेड कंपन्यांच्या नावे बनावट कपडे विकल्याची माहिती समोर…
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी (Bell's palsy) हा आजार झाला…