तब्बल अडीच कोटींचा करणार खर्च
मुंबई : माटुंगा येथील (Matunga) महात्मा गांधी महापालिका मंडईची (Gandhi Market, Matunga) आता मोठ्या स्वरूपातील दुरुस्ती करण्यात येणार असून मागील अनेक महिन्यांपासून या मंडईच्या दुरुस्तीची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून केली जात होती. अखेर या मंडईच्या दुरुस्तीसाठी महापालिकेच्या वतीने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे या मंडईच्या दुरुस्तीचे काम लवकरच महापालिकेच्या (BMC) वतीने हाती घेण्यात येणार असल्याचे कळते.
माटुंगा येथील महापालिकेच्या मालकीच्या महात्मा गांधी महापालिका मंडईच्या पुनर्विकासाची चर्चा असतानाच प्रत्यक्षात पुनर्विकासाअभावी या मंडईची दुरवस्था होत असल्याने बाजार विभागाच्या शिफारशीनुसार महापालिकेच्या या मंडईच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आहे. मंडईची ही इमारत ५० वर्षे जुनी आहे. तळ अधिक एक मजल्याची ही इमारतीच्या काही मुख्य दुरुस्त्या केल्या जाव्यात अशी मागणी केली होती. (Mumbai News)
Dahanu Traffic Jam : डहाणू तालुक्यात वाहतूक कोंडीची समस्या ‘जैसे थे’!
त्यानुसार महापालिकेच्या वतीने या मंडईच्या दुरुस्तीकरता निविदा मागवून कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. या मुख्य दुरुस्तीच्या कामांसाठी महाकाली कंस्टक्शन या कंपनीची निवड करयात आली असून यासाठी विविध करांसह सुमारे अडीच कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. महापालकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मंडईची ही इमारत सी टू प्रवर्गात मोडत असून यासाठी नेमलेल्या एफ के कन्सल्टंट यांनी दिलेल्या अहवालानुसार या मंडईच्या मुख्य दुरुस्त्या केल्या जात आहे. ही दुरुस्ती टप्प्याटप्प्याने केली जाणार असून या दुरुस्तीकरता गाळेधारकांचे सहकार्य अपेक्षित आहे. गाळेधारकांच्या सुरक्षेकरताच ही दुरुस्ती केली जात असल्याने यासर्व गाळेधारकांकडून सहकार्य मिळेल अशीही आशा महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
मंडईच्या मुख्य दुरुस्त्यांमध्ये या कामांचा समावेश
- आवश्यकतेनुसार पॉलीमर मॉडीफाईड मॉर्टर ट्रीटमेंट, मायक्रो कॉन्क्रीट, जॅकेटिंग इत्यादी.
- अंतर्गत तसेच बाह्य भागास आवश्यकतेनुसार सिमेंट गिलाव्याची कामे.
- गच्चीचे जलभेदीकरण करणे.
- रंगकाम करणे.
- प्लंबिंगची व ड्रेनेजची कामे करणे.
- विद्युत कामे व इतर दुरुस्तीची कामे करणे.