Friday, May 9, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

नॅशनल हेराल्ड प्रकरणी ‘ईडी’कडून ७०० कोटींची मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू

नॅशनल हेराल्ड प्रकरणी ‘ईडी’कडून ७०० कोटींची मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू

नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाने नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी अडचणीत आले आहेत. त्यांच्याशी संबंधित असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड या कंपनीच्या ७०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या मालमत्तेचा ताबा घेण्याची प्रक्रिया ईडीने शनिवारी सुरू केली आहे.


या मालमत्तांमध्ये दिल्ली, मुंबई आणि लखनौ येथील प्रमुख व महत्त्वाच्या जागांचा समावेश आहे. यामध्ये राजधानी दिल्लीतील बहादूरशहा जफर मार्गावरील हेराल्ड हाऊस या प्रतिष्ठित इमारताचीही समावेश आहे.



ईडीने सांगितले की, ही कारवाई एजेएल मनी लॉन्डरिंग प्रकरणाच्या अनुषंगाने केली जात आहे. ही प्रक्रिया प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्डरिंग अॅक्ट (पीएमएलए) २००२ च्या कलम ८ आणि मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक (जप्त केलेल्या किंवा गोठवलेल्या मालमत्तेचा ताबा घेणे) नियम २०१३ अंतर्गत करण्यात येत आहे.


नॅशनल हेराल्ड हे वर्तमानपत्र प्रकाशित करणारी कंपनी एजेएल ही यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीची आहे. या कंपनीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे प्रत्येकी ३८ टक्के शेअर्स आहेत, ज्यामुळे ते मुख्य भागीदार ठरतात. यातील उर्वरीत सहभागी मोतीलाल व्होरा आणि ऑस्कर फर्नांडिस या काँग्रेस नेत्यांचे निधन झाले आहे.

Comments
Add Comment