Friday, May 9, 2025

महामुंबईमहाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Hanuman Jayanti : आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी दान करा या वस्तू

Hanuman Jayanti : आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी दान करा या वस्तू
मुंबई : हनुमान जयंती शनिवार १२ एप्रिल रोजी आहे. या निमित्ताने देशभरातली हनुमान मंदिरांना फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. देशातील प्रसिद्ध हनुमान मंदिरांमध्ये सकाळपासूनच भक्तांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. हनुमान जयंती निमित्त भक्त श्रद्धेने उपवास करतात, हनुमानाची पूजा करतात. हनुमान मंदिरांमध्ये भजन, किर्तनाचे कार्यक्रम होतात. भक्त मनापासून हनुमानाला प्रार्थना करतात.



अनेकांना कदाचित हे माहिती नसेल की हनुमान जयंतीच्या दिवशी मनापासून दान केल्यास लाभ होतो असे सांगतात. घरात सुख - समृद्धी येते. या निमित्ताने जाणून घ्या हनुमान जयंतीच्या दिवशी काय दान करता येते ?

  1. हळदीचे दान किंवा हळकुंडाचे दान : हनुमान जयंतीच्या दिवशी हळद दान केल्याने घरात धन धान्य समृद्धी येते. सुख शांती नांदते. आर्थिक समृद्धी येते.

  2. धान्याचे दान : हनुमान जयंतीच्या दिवशी गरजू व्यक्तींना धान्य दान केले तर आयुष्यभर दान करणाऱ्यावर लक्ष्मीची कृपा राहते.

  3. लाडवाचे दान : हनुमानाला लाडू प्रिय. यामुळे हनुमान जयंतीच्या दिवशी लाडवांचे दान केले तर दान करणाऱ्यावर हनुमानाची कृपा राहते. त्या व्यक्तीला नकारात्मक शक्तींपासून होणारा त्रास दूर होतो. नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळते. अडचणी दूर होतात. प्रगती होते.

  4. फुटाणे आणि गुळाचे दान : हनुमानाला लाडवांव्यतिरिक्त फुटाणे आणि गुळ प्रिय. यामुळे हनुमान जयंतीच्या दिवशी फुटाणे आणि गुळाचे दान केले तर दान करणाऱ्यावर हनुमानाची कृपा राहते. त्या व्यक्तीला नकारात्मक शक्तींपासून होणारा त्रास दूर होतो. नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळते. अडचणी दूर होतात. प्रगती होते.


हनुमान जयंतीच्या दिवशी दिवसभर उपवास केला, हनुमानाची भक्ती केली. मनापासून हनुमानाची प्रार्थना केली आणि दानधर्म केला तर संबंधित व्यक्तीवर हनुमानाची कृपा राहते.

अस्वीकरण : ही माहिती इंटरनेट विश्वातून संकलित केली आहे. उपरोक्त माहितीची पडताळणी 'प्रहार'ने केलेली नाही. या माहितीआधारे कोणतीही कृती करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे आहे.
Comments
Add Comment