Tuesday, April 29, 2025
Homeब्रेकिंग न्यूजDharashiv Crime : पुण्यातला कुख्यात गुंड निलेश घायवळला कुस्ती स्पर्धेत मारहाण

Dharashiv Crime : पुण्यातला कुख्यात गुंड निलेश घायवळला कुस्ती स्पर्धेत मारहाण

पुणे : पुण्यातला कुख्यात गुंड निलेश घायवळ याला मारहाण करण्यात आल्याची घटना घडलीय. कुस्ती स्पर्धेवेळी ही मारहाण झालीय. निलेश घायवळ एका पैलावानाची भेट घ्यायला गेला असताना अचानक दुसरा पैलवान घायवळच्या अंगावर धावून गेला. त्या पैलवानाने निलेश घायवळला मारहाण केली असल्याची माहिती समोर आलीये. भूम तालुक्यातील आंदरूड गावात यात्रेनिमित्त भरवलेल्या कुस्ती स्पर्धेत हा प्रकार घडला.

आंदरूड येथील ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त ही स्पर्धा भरवण्यात आली होती. निलेश घायवळ याने या स्पर्धेचे आयोजन केले होते. निलेश घायवळ ही कुस्ती पाहण्यासाठी आला होता. तो कुस्तीच्या फडात जाऊन पैलवानांची भेट घेत होता. त्यावेळी एक पैलवान अचानक निलेश घायवळच्या अंगावर धावून केला. या पैलवानाने निलेश घायवळ याला मारहाण केल्याचे समजते. त्याने निलेश घायवळच्या श्रीमुखात लगावली. मात्र, आजुबाजूचे लोक लगेच निलेश घायवळच्या मदतीला धावून आले. घायवळ समर्थकांनी या पैलवानाला चोप दिला हल्ला करणारा पैलवान हा अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड गावचा असल्याचे समजते. निलेश घायवळ याला मारहाण केल्यानंतर हा पैलवान घटनास्थळावरुन फरार झाला असून पोलीस सध्या त्याचा कसून शोध घेत आहेत.

मुंबई लोकल नाशिकपर्यंत लवकरच धावणार

नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत निलेश घायवळ हा आयोजकांसोबत कुस्तीच्या मैदानात राऊंड मारताना दिसत आहे. त्याच्या स्वागतासाठी हलगी वाजवल्या जात असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. हलगी वाजवणाऱ्यांच्या मागे निलेश घायवळ आणि कुस्ती स्पर्धेचे आयोजक चालताना दिसत आहे. हे सर्वजण कुस्तीच्या फडात पहिलवानांना भेटण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी आले होते. त्यावेळी समोरच उभ्या असलेला पैलवान निलेश घायवळ याच्या अंगावर धावून गेला. या पैलावानाने निलेश घायवळच्या कानाखाली मारली. त्यानंतर हा पैलवान निलेश घायवळला आणखी मारहाण करण्याच्या बेतात होता. मात्र, घायवळ गँगमधील सहकारी या पैलवानावर तुटून पडले. त्यांनी या पैलवानाला चांगलाच चोप दिला. या घटनेमुळे कु्स्ती स्पर्धेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

गुन्हेगार निलेश घायवळ याच्यावर यापूर्वी मोक्का, खुन, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, खंडणी, दरोडा, गर्दी जमवून दंगा करणे, गंभीर दुखापत करणे, मारामारी असे गंभीर स्वरुपाचे एकूण १० पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. मध्यंतरी निलेश घायवळ व त्याच्या साथीदारांविरुद्ध भिगवण पोलीस स्टेशनला अपहरण खंडणीचा गुन्हा दाखल झालेला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -