Saturday, April 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis : 'छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून लोटावं असं वाटतं, पण…'

Devendra Fadnavis : ‘छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून लोटावं असं वाटतं, पण…’

किल्ले रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांची ३४५ वी पुण्यतिथी आणि शिवरायांच्या समाधीच्या जिर्णोद्धाराला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रायगडावर आयोजित विशेष कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना खासदार उदयनराजे भोसले यांनी काही मागण्या केल्या. या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब मान्य केल्या.

Badlapur : विद्यार्थ्याने शिवी दिली तर होणार कठोर कारवाई

छत्रपती शिवाजी महाराजांसह आपल्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कायद्याने कठोर कारवाई व्हायलाच हवी, असे खासदार उदयनराजे भोसले म्हणाले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समग्र इतिहासाचे महाराष्ट्र शासनाने प्रकाशन करावे अशीही मागणी केली. खासदार उदयनराजे भोसले यांच्या या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब मान्य केल्या.

Mumbai : मुंबईतील नालेसफाईच्या कामांचा आयुक्त घेणार दैनंदिन आढावा

खासदार उदयनराजे भोसले यांनी कार्यक्रमाच्या निमित्ताने मागण्या जाहीरपणे केल्या आहेत. पण याआधीच या मागण्यांबाबत राज्य शासन आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात सविस्तर चर्चा झाली आहे. महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करणार आहे. आपल्या महापुरुषांचा, छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्याला टकमक टोकावरून लोटून दिलं पाहिजे. पण आपण लोकशाही असलेल्या देशात राहतो. आपल्या देशात अशा गुन्हेगारांवर कायद्यानुसार कारवाई होईल. कायद्यात आणखी कठोर तरतुदी करण्याचं आम्ही ठरवलं आहे; असेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्य सरकारच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमाण इतिहास तयार करण्याचे काम लवकरच हाती घेऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

Mumbai : मुंबईतील सोडियम व्हेपरचे ९५ टक्के दिवे बनले एलईडीचे

खासदार उदयनराजेंनी केलेल्या प्रमुख मागण्या

  1. छत्रपती शिवाजी महाराज, माँ जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अनुद्गार काढणाऱ्यांना १० वर्षांची शिक्षा झाली पाहिजे असा कायदा करा. महापुरुषांविषयी अनुद्गार काढणाऱ्यांना जामीन देऊ नये.
  2. राज्य सरकारने शिवरायांचा समग्र इतिहास प्रकाशित करावा. महापुरुषांविषयीच्या कलाकृती प्रसिद्ध होण्याआधी त्यांची सेन्सॉर बोर्डाकडून तपासणी करुन घेण्याचे बंधन असावे आणि त्यासाठी तसे सेन्सॉर बोर्ड करावे.
  3. छत्रपती शिवाजी महाराजांचे दिल्लीत स्मारक उभारावे
  4. शहाजीराजे भोसले यांच्या समाधीसाठी पुरेसा निधी महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारने उपलब्ध करुन द्यावा.
  5. राज्यपालांच्या निवासस्थानाजवळ शिवस्मारक उभारावे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -