मुंबई : मध्य रेल्वेच्या बदलापूर आणि वांगणी स्थानकांदरम्यान लवकरच ‘पुढील स्टेशन – कासगाव’ अशी घोषणा ऐकू येणार आहे. बदलापूरकरांसाठी नवी मुंबई गाठण्यासाठी ही एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने कासगाव-मोरबे-मानसरोवर असा नवा रेल्वेमार्ग उभारण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी सर्वेक्षणही सुरू करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे बदलापूर आणि नवी मुंबईमधील अंतर केवळ ३० मिनिटांवर येणार आहे. यामुळे नवी मुंबईला ये-जा करण्यासाठी बदलापूरवासीयांची आता दमछाक होणार नाही.
Nashik Crime : नाशिकमध्ये सैन्याच्या लेखा विभागातील प्रशासकांनी केला आर्थिक घोटाळा, CBI ची कारवाई
नाशिक : नाशिकमध्ये सैन्याच्या लेखा विभागातील प्रशासकांनी आर्थिक घोटाळा केला. या प्रकरणी सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई पथकाने पाच ...
सध्या बदलापूर शहरातून तसेच मध्य रेल्वेवरून दररोज हजारो नागरिक नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने नवी मुंबईला प्रवास करतात. जर त्यांना रेल्वेने प्रवास करायचा असल्यास त्यांना ठाण्यावरून लोकल बदलावी लागते. तसेच रस्ते मार्गाने नवी मुंबई गाठण्यासाठी एनएमएमटीच्या बस उपलब्ध आहेत. मात्र शिळफाटा आणि तळोजा या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होते. यामुळे प्रवासाला दीड तासांपर्यंतचा वेळ लागतो. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
या समस्येवर मात करण्यासाठी कासगाव-मोरबे-मानसरोवर या नवीन रेल्वेमार्गाची योजना आखण्यात आली आहे. हा मार्ग सुरू झाल्यास बदलापूरमधील प्रवाशांना नवी मुंबईला अवघ्या ३० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे. या प्रकल्पासाठी बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.