Friday, May 23, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Amravati Airport : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १६ एप्रिलला अमरावती विमानतळाचे लोकार्पण

Amravati Airport : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १६ एप्रिलला अमरावती विमानतळाचे लोकार्पण

अमरावती : गेल्या अनेक वर्षांपासून बहुप्रतिक्षेत असलेल्या अमरावती (बेलोरा) विमानतळाचे १६ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते लोकार्पण होणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित राहणार आहेत. आठवड्यातुन सोमवार बुधवार आणि शुक्रवार असे तीन दिवस अमरावतीकरांना विमानवारी करता येणार आहे. अलायन्स एअर लाईनच्या संकेत स्थळावर वेळापत्रक जारी करण्यात आले आहे अशी माहिती आज महाराष्ट्र एअर डेवलपमेंट कंपनी च्या संचालिका स्वाती पांडे व जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी विमानतळावर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली..


अमरावती विमानतळ विदर्भाच्या अर्थव्यवस्था,व्यापार,पर्यटन आणि हवाई संपर्कासाठी गेम चेंजर ठरणार असून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी उडाण योजनेंतर्गत विकसित हे विमानतळ केवळ पायाभूत सुविधा नव्हे,तर उद्योग,व्यवसाय आणि प्रवासासाठी सुवर्णद्वार ठरणार आहे असे जिल्हाधिकारी सौरभ यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी अंतर्गत अमरावती विमानतळ हे राज्यातील तिसरे व्यावसायिक विमानतळ आहे.



मुंबई-अमरावती-मुंबई असा विमानसेवा करार


प्रादेशिक संपर्क योजना उडानअंतर्गत व्यावसायिक विमानसेवा अमरावती विमानतळाहून सुरू होत आहे. त्यानुसार आठवड्यातून तीन दिवस अमरावतीकरांना मुंबईने विमानवारी करता येईल, असे वेळापत्रक अलायन्स एअर लाइन्सने जारी केले आहे. अमरावती विमानतळावर अत्याधुनिक पायाभूत सुविधा, नेव्हिगेशन प्रणाली आणि ग्राउंड हैंडलिंगची चाचपणी चमूद्वारे झालेली आहे. अलाइन्स एअर लाइनच्या करारानुसार मुंबई-अमरावती-मुंबई अशी विमानसेवा असणार आहे.तर येत्या काळात पुणे,नवी दिल्ली ही विमान सेवा सुरु करण्याची तयारी सुरु ज़ली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Comments
Add Comment