Friday, May 9, 2025

ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजरायगड

Mumbai Goa Highway : अरेरे, त्या अपघातातील वडिलांपाठोपाठ जखमी रियाचे निधन

Mumbai Goa Highway : अरेरे, त्या अपघातातील वडिलांपाठोपाठ जखमी रियाचे निधन

पोलादपूर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai Goa Highway) लोहार माळ येथे शिवराजबीआय शॉपीच्या समोर आयशर टेम्पोची स्कूटरला धडक बसून झालेल्या अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या रिया सुनील पवार हिचे एमजीएम कामोठे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाल्याची बातमी आज कळविण्यात आली. यामुळे जत्रोत्सवापासून आजूबाजूच्या गावातही हळहळ आणि शोकाकुल व्हावे लागले.


सुनील पवार यांची पत्नी आणि मुलगा यांना किरकोळ जखमा आणि मुकामार लागला. सुनील पवार याला रुग्णालयात हलविण्यात आले असता वाटेतच मृत्यू झाला.‌



तर गंभीर जखमी अवस्थेत रिया हिला एमजीएम कामोठे रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले असता तिथे तिच्यावर शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि तिचे जीव वाचण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र पहाटेच्या सुमारास ती उपचारादरम्यान मयत झाल्याची माहिती पोलादपूरला येऊन धडकली आणि पोलादपूर पुन्हा एकदा शोक सागरात बुडाले.

Comments
Add Comment