Tuesday, April 29, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

PM Modi : महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

PM Modi : महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज(दि.११) महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. महात्मा फुले हे मानवतेचे सच्चे सेवक होते अशा शब्दांत त्यांनी महात्मा फुले यांचा गौरव केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत थोर समाजसुधारक महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान मोदी यांनी पोस्टमध्ये लिहिले की, मानवतेचे सच्चे सेवक महात्मा फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त नमन करतो. त्यांनी समाजातील शोषित आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण केले. देशासाठी त्यांनी दिलेले हे अनमोल योगदान प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील.

Comments
Add Comment