Friday, April 18, 2025
Homeताज्या घडामोडीपालकांनो लक्ष द्या! सात महिन्याच्या बाळाने गिळली हेअरक्लिप

पालकांनो लक्ष द्या! सात महिन्याच्या बाळाने गिळली हेअरक्लिप

मालेगाव : मालेगावात एक धक्कादायक घटना घडली आहे. चक्क सात महिन्याच्या बाळाच्या घशामध्ये हेअरक्लिप अडकली. मात्र डॉक्टरांच्या मदतीने बाळाच्या गळ्यात अडकलेली हेअरक्लिप यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आली आहे.

Job Opportunity : मुंबई विद्यापीठात नोकरी करण्याची सुवर्णसंधी! जाणून घ्या पात्रता

मिळलेल्या माहितीनुसार, सात महिन्याचे बाळ घरात नेहमीप्रमाणे खेळत असताना त्याने चुकून शेजारी पडलेली हेअरक्लिप तोंडात घातली. वेळेत कुणाचेही लक्ष न गेल्याने बाळाने ती क्लिप गिळण्याचा प्रयत्न केला आणि क्लिप घशात अडकून पडली. त्याला श्वास घ्यायला अडचण यायला सुरुवात झाली, श्वास अडकला तसे कुटुंबीय घाबरले. बाळाने नक्की काय गिळले आहे कुणालाही सांगता येत नव्हते. मात्र एक्स रे काढल्यानंतर हेअरक्लिप गिळल्याचे लक्षात आले आणि सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला.

बाळाला तातडीने मालेगाव शहरातील शौर्या इएनटी हॉस्पिटल मध्ये डॉ. शुभांगी अहिरे यांच्याकडे आणण्यात आले. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून डॉ. अहिरेंनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचे ठरवून कुटुंबियांना तशी कल्पना दिली. बाळ खूपच लहान असल्याने अर्थातच शस्त्रक्रियेतली जोखीमही मोठी होती. कुटुंबीयांनी तातडीने संमती दिल्यानंतर ताबडतोब डॉ. अहिरे यांनी बाळाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतले. अखेर बऱ्याच अथक प्रयत्नांनी नाजूक शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर घशात अडकलेली हेअर क्लिप बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. दरम्यान बाळाचा श्वास पूर्ववत सुरू झाल्याने कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -