Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Job Opportunity : मुंबई विद्यापीठात नोकरी करण्याची सुवर्णसंधी! जाणून घ्या पात्रता

Job Opportunity :  मुंबई विद्यापीठात नोकरी करण्याची सुवर्णसंधी! जाणून घ्या पात्रता

मुंबई : तुम्ही सुद्धा नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. मुंबई विद्यापीठात सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी पदवीधर, डिप्लोमा केलेले उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकणार आहेत. मुंबई विद्यापीठात एकूण ९४ पदांसाठी भरती होणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही NATS 2.0 पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ एप्रिल २०२५ आहे.



कोणत्या पदांसाठी अर्ज करू शकता ?


मुंबई विद्यापीठाने प्रयोगशाळा असिस्टंट, ग्रंथालय सहाय्यक, इलेक्ट्रशियन, सुतार, प्लंबर, चालक, मल्टी टास्क ऑपरेचरसह इतर अनेक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. याबाबत मुंबई युनिव्हर्सिटीने जाहिरात प्रसिद्ध केली आहे.



वरील पदांसाठी काय पात्रता असणे आवश्यक आहे ?


वरील पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.वित्त आणि लेखा सहाय्यक पदासाठी कॉमर्समध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. स्टेनोग्राफर पदासाठी कॉमर्समध्ये पदवी, स्टेनोग्राफी प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे. ज्युनिअर इंजिनियर (सिव्हिल) पदासाठी संबंधित क्षेत्रात पदवी किंवा डिप्लोमा प्राप्त केलेला असावा. कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रॉनिक्स) पदासाठी इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग पदवी प्राप्त केलेली असावी. लॉ असिस्टंट पदासाठी कायद्याची पदवी प्राप्त केलेली असावी. प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी विज्ञान शाखेत पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत टायपिंग, एमएस-सीआयटी प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे. इलेक्ट्रिशियन पदासाठी इलेक्ट्रिशियन पदवी प्राप्त केलेली अशावी. मल्टी टास्क ऑपरेटर पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेली असावी.



ही भरती अप्रेंटिस पदासाठी होणार आहे. त्यामुळे अप्रेंटिसशिपचा कालावधी पूर्ण झाल्यावर नोकरी करण्याचे तुमच्यावर कोणतेही बंधन असणार नसल्याचे मुंबई विद्यापीठाने नमूद केले आहे.

Comments
Add Comment