अमृतसर : पंजाब पोलिसांनी अमृतसरच्या घरिंडा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या खैरा गावातील हिरा सिंग याला अटक करून त्याच्याकडून 18.227 किलो हेरॉईन जप्त केली आहे. आतंरराष्ट्रीय बाजारपेठेत याचे मूल्य 127.54 कोटी रुपये आहे. पंजाब पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स (एएनटीएफ) बॉर्डर रेंज यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.
याप्रकरणाच्या तपासात असे आढळले की, हीरा सिंग आणि त्याचा साथीदार कुलविंदर सिंग उर्फ किंडा (गाव दौके, पोलिस स्टेशन घरिंडा) हे पाकिस्तानस्थित ड्रग्ज तस्कर ‘बिल्ला’ याच्या संपर्कात होते. बिल्लाच्या सूचनेनुसार हे दोघेही सीमेपलीकडून हेरॉइनची तस्करी करायचे आणि पंजाबमध्ये ते पुरवायचे. हे हेरॉइन पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे पोहोचवले जात होते किंवा सीमावर्ती भागात निश्चित ठिकाणी सोडले जात होते. बिल्लाच्या सूचनेनुसार, हीरा सिंग आणि त्याचा साथीदार हे सामान उचलून राज्याच्या विविध भागात तस्करी करायचे. हीरा सिंगला अटक करण्यात आली असली तरी त्याचा साथीदार कुलविंदर सिंग अजूनही फरार आहे. पोलिस पथके त्याच्या संभाव्य लपण्याच्या ठिकाणांवर सतत छापे टाकत आहेत. या नेटवर्कमध्ये आणखी कोण कोण सामील आहे हे देखील सुरक्षा संस्था शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
पंजाबचे डीजीपी गौरव यादव म्हणाले की, ही अटक पंजाबमधील अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्धच्या आमच्या धोरणात्मक कारवाईचा एक भाग आहे. पाकिस्तानमधील ड्रग्ज नेटवर्क नष्ट करण्यासाठी आम्ही प्रत्येक पातळीवर कठोर कारवाई करत आहोत. हीरा सिंगची चौकशी सुरू आहे आणि लवकरच संपूर्ण नेटवर्क उघड होईल.
जप्त केलेले 18.227 किलो हेरॉइन हे या वर्षातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या जप्तींपैकी एक आहे. यासोबतच, हीरा सिंगने कोणत्या ठिकाणी हेरॉइनचा पुरवठा केला आहे हे देखील पोलिस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३४व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना पंजाब किंग्सशी आहे.…
नवी दिल्ली : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला…
घाटकोपर मध्ये हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके जाळून मनसेने केला निषेध मुंबई : हिंदी भाषा सक्ती विरोधात…
या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांचीही चौकशी करा कुडाळ : वैभव नाईक जेव्हा आमदार…
नवी मुंबई : प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांव्दारे एकल वापरातील प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास…
मुंबई : राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात…