Sunday, April 20, 2025
Homeक्रीडाIPL 2025CSK: धोनीने मैदानावर उतरताच रचला इतिहास, IPL मध्ये असे करणारा पहिला खेळाडू

CSK: धोनीने मैदानावर उतरताच रचला इतिहास, IPL मध्ये असे करणारा पहिला खेळाडू

मुंबई: आयपीएल २०२५मधील २५व्या सामन्यात आज चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यात टक्कर होत आहे. चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडियममध्ये आयोजित या सामन्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

महेंद्रसिंग धोनीने टॉस साठी मैदानावर पाऊल ठेवताच इतिहास रचला आहे. धोनी आयपीएलच्या इतिहासात एखाद्या संघाचे नेतृत्व करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे. धोनी टेक्निकलप्रमाणे अनकॅप्ड खेळाडू नाही दरम्यान, आयपीएलच्या नव्या नियमांनुसार तो अनकॅप्ड खेळाडू आहे.

बीसीसीआयने मेगा लिलावाच्या आधी निर्णय घेतला होता की ज्या खेळाडूने गेल्या ५ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही त्याला अनकॅप्ड खेळाडू म्हटले जाईल. अशातच धोनी या कॅटेगरीमध्ये येतो.

चेन्नई सुपर किंग्सने महेंद्रसिंग धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून ४ कोटींना रिटेन केले होते. धोनीने भारतासाठी आपला शेवटचा सामना २०१९मध्ये वर्ल्डकप न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. आयपीएल २०२५मध्ये धोनी प्रमाणेच संदीप शर्मा आणि मोहित शर्मा अनुक्रमे राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्ससाठी अनकॅप्ड प्लेयर म्हणून खेळत आहेत.

धोनी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वयस्कर कर्णधारही आहे. धोनीने ४३ वर्षे २८७ दिवस असताना सीएसकेचे नेतृ्त्व केले आहे. यात त्याने आपलाच रेकॉर्ड मागे टाकला आहे. आयपीएलच्या या हंगामात ऋतुराजला दुखापत झाल्याने तो आयपीएलबाहेर झाला आहे. अशातच चेन्नईने धोनीला पुन्हा कर्णधार बनवले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -