अमरावती : गोमातेची सेवा करणे हे प्रत्येक हिंदू धर्मीयांचे कर्तव्य आहे, असे सांगत येथील जेपीपी जैन महिला फाउंडेशन व जैन संस्था युवा मंचच्या वतीने गोमातेला छप्पन भोग अर्पण करण्यात आला. महाराष्ट्रातील या ऐतिहासिक व अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. जैन धर्मगुरू भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम घेण्यात आला.
येथील धर्मदाय कॉटन फंड कमिटीमध्ये जैन धर्मीयांनी गौतम प्रसादीचे आयोजन केले होते. त्याचवेळी गोमातेसाठी छप्पन भोगही अर्पण केला. ३१ क्विंटल सामग्रीपासून बनवलेले विविध मिष्टान्न व इतर पदार्थांचा यात समावेश होता. गोमातेसाठीचे हे भोजन जिल्ह्यातील सर्व गोशाळेत पोहोचवले जाणार असल्याचेही सांगण्यात आले. या उपक्रमातून महाराष्ट्रात ‘गो वात्सल्य-गो माता सेवे’चा संदेश देण्यात आला. या उपक्रमाचे आ. सुलभा खोडके, आ. रवी राणा, माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी महापौर मिलिंद चिमोटे, अभिनंदन बँकेचे नवीन चोरडिया आदींनी कौतुक केले आहे. संपूर्ण विश्वाला दया, क्षमा, शांतीचा संदेश देणारे भगवान महावीर यांची जयंती भक्तिभावाने साजरी करण्यात आली.
Burger King : बर्गर किंगकडून ‘कोरियन स्पायसी फेस्ट’ सुरु! ‘हे’ आहेत नवीन मेनू
जैन धर्मातील परंपरा व संस्कृतीनुसार जेपीपी जैन महिला फाउंडेशन व जैन संस्था युवा मंचच्या वतीने प्रभातफेरी काढण्यात आली होती. भाजीबाजार येथून निघालेली ही फेरी जयस्तंभ चौकात पोहोचल्यानंतर तेथे किर्ती स्तंभाची पूजा करण्यात आली. त्याचवेळी महावीर पाणपोईचे उद्घाटनही करण्यात आले.
अमरावती येथील कार्यक्रमानंतर बडनेरा नवी वस्ती येथील भगवान महावीर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमातही आमदार रवी राणा यांनी उपस्थिती दर्शवली. या वेळी भगवान महावीर चौकाच्या सौंदर्यीकरणासाठी त्यांनी ५ लाख रुपये अनुदान देण्याची घोषणाही केली. आ. रवी राणा यांच्या या घोषणेचे जैन समाजबांधवांनी स्वागत केले.