पाटणा: बिहारमध्ये अवकाळी पाऊस आणि वादळ वाऱ्यामुळे 31 जणांचा मृत्यू झाला आहे. बिहारच्या नालंदा, सिवान, भोजपूर, गोपाळगंज, बेगुसराय, सारण, गया, जहानाबाद आणि अरवल येथे वीज पडून आणि मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी झाडे, भिंती, कल्व्हर्ट आणि ढिगारे कोसळल्याने मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे.
या जिल्ह्यांमध्ये एकूण ३१ जणांना मृत्यू झाला असून नालंदामध्ये सर्वाधिक १३ जणांना आपला जीव गमवावा लागला. राज्याच्या नालंदा जिल्ह्यातील मानपूर पोलीस ठाण्याच्या नागवान गावात देवी स्थानाच्या भिंतीवर एक मोठे पिंपळाचे झाड कोसळले, झाड आणि भिंतीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्यामुळे त्याच ठिकाणी ६ जण मृत्यूमुखी पडले. तर इस्लामपूर जिल्ह्यातील बालमत बिघा गावाजवळ एक कल्व्हर्ट कोसळल्याने ढिगाऱ्याखाली दबून आजी, तिचा २ वर्षांचा नातू आणि ९ महिन्यांच्या नातीचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील पावापुरी सहाय्यक पोलीस ठाण्याच्या दुर्गापूर खांडा येथे एका १० वर्षीय मुलाचा ताडाच्या झाडाने चिरडून मृत्यू झाला. जिल्ह्यातील सिलाव येथील माधोपूर येथे ताडाच्या झाडाने चिरडून दोघांचा मृत्यू झाला. त्याच वेळी, राजगीरच्या सारिलचक येथे झाडाने चिरडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
भोजपूरमध्ये आई आणि मुलासह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एका व्यक्तीचा वीज पडून मृत्यू झाला तर 4 जणांचा भिंत आणि झाडावर चिरडून मृत्यू झाला. भोजपूरच्या बरहारामध्ये बिहार ते उत्तर प्रदेशला जोडणारा माहुली घाट-सीताबदियारा पोंटून पूल मुसळधार वादळ आणि पावसामुळे तुटला आहे. त्याशिवाय सिवानमध्ये वीज पडून चौघांचा मृत्यू झाला आहे. सारणच्या पानापूरमध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू झाला आहे. गोपाळगंजमध्ये झोपडीवर झाड कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. जहानाबादमध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू झाला आहे.
अरवल-पाटणा सीमेवरील पाटण्याच्या बेदौली गावात भिंत आणि झाडाखाली चिरडून २ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बेगुसरायच्या चेरिया बरियारपूरमध्ये वीज पडून एका किशोरवयीन मुलीचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे गया जिल्ह्यातील तंकुप्पा ब्लॉकमधील बेतौरा पंचायतीच्या मायापूर गावात भिंत कोसळून एका ८ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. वादळ आणि पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे कोसळली. कच्च्या आणि कौलारू घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. ज्या शेतकऱ्यांचे गव्हाचे पीक अद्याप कापलेले नाही. त्यांना काही प्रमाणात दिलासा आहे. परंतु ज्यांच्या पिकांची कापणी होऊ त्यांचे पिकं शेतात पडून आहेत अशांचे या वादळ-वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ३४व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना पंजाब किंग्सशी आहे.…
नवी दिल्ली : आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा ठरला आहे. भारताच्या सांस्कृतिक वारशाला…
घाटकोपर मध्ये हिंदी माध्यमातील पाठ्यपुस्तके जाळून मनसेने केला निषेध मुंबई : हिंदी भाषा सक्ती विरोधात…
या प्रकरणात माजी आमदार वैभव नाईक यांचीही चौकशी करा कुडाळ : वैभव नाईक जेव्हा आमदार…
नवी मुंबई : प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांव्दारे एकल वापरातील प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास…
मुंबई : राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात…