मुंबई: उकाड्याने आपले प्रचंड रूप दाखवणे सुरू केले आहे. या उकाड्यामुळे केवळ माणूस अथवा प्राणीच त्रस्त झालेले नाहीत तर स्मार्टफोनही त्रस्त होत आहेत. अनेकांची तक्रार आहे की त्यांचा स्मार्टफोन ओव्हरहीट होत आहे. फोनच्या ओव्हरहीटचा अर्थ म्हणजे त्याच्या परफॉर्मन्सवर परिणाम होणे.
तसेच स्मार्टफोनमधील एखादा पार्ट्स खराबही होऊ शकतो. अशातच तुम्ही कसा ठेवाल तुमचा स्मार्टफोन कूल कूल… या आहेत टिप्स
सगळ्यात आधी डायरेक्ट सूर्यप्रकाशापासून आपल्या स्मार्टफोनचे रक्षण करा. फोनला कधीही कारच्या डॅशबोर्डवर ठेवू नका. यामुळे हँडसेट खराबही होऊ शकतो.
स्क्रीनची ब्राईटनेस कमी ठेवून तुम्ही स्मार्टफोन गरम होण्यापासून वाचवू शकता. सोबतच ब्लूटूथ, वायाय आणि दुसरे फीचर्सही काम नसताना बंद करा.
जर तुमचा फोन खूप गरम होत असेल तर तो काही वेळासाठी एअरोप्लेन मोडवर ठेवा. यामुळे फोन लवकर थंड होईल.
चार्जिंग करताना स्मार्टफोनचे कव्हर काढा. यामुळे फोन जास्त गरम होणार नाही. तसेच तुम्हाला ओव्हरहिटींगचा त्रासही होणार नाही.
याशिवाय तुम्ही फोनसोबत कूलिंगचा फॅनचा वापर करा. अशातच गेमिंग आणि चार्जिंगवेळेस फोन थंड राहील. जिथे जागा जास्त गरम आहे अशा ठिकाणी आपला फोन चार्जिंग करू नका.