Friday, April 18, 2025
Homeक्रीडाIPL 2025Ms Dhoni : ऋतुराज गायकवाडला दुखापत, धोनी पुन्हा सीएसकेचा कर्णधार

Ms Dhoni : ऋतुराज गायकवाडला दुखापत, धोनी पुन्हा सीएसकेचा कर्णधार

चेन्नई : चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. संघाचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड कोपराच्या दुखापतीमुळे आयपीएल २०२५ मधून बाहेर पडला आहे. गायकवाडच्या अनुपस्थितीत माही म्हणजेच एमएस धोनी (Ms Dhoni) पुन्हा एकदा कर्णधारपदाची सूत्रे हाती घेणार आहे. या निर्णयाला मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी अधिकृत दुजोरा दिला आहे.

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात ३० मार्च रोजी गायकवाडच्या कोपराला मार लागला होता. दुखापत झाली तरी ऋतुराज गायकवाड दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्जविरुद्ध खेळला. हा निर्णय त्याला भोवला. दुखापत बळावली. स्कॅन केल्यावर फ्रॅक्चर असल्याचे लक्षात आले. डॉक्टरांनी दुखापत बरी होईपर्यंत खेळण्यास मनाई केल्यामुळे गायकवाड यंदाच्या हंगामातून बाहेर पडला आहे. यानंतर धोनीकडे संघाचे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय झाला आहे.

ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा थरार २०२८ मध्ये दिसणार

कर्णधार दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर जाणे हे पाच वेळा आयपीएल विजेता असलेल्या CSK साठी मोठी धक्का देणारी बातमी आहे. पण चाहत्यांसाठी दिलासा म्हणजे त्यांच्या आवडत्या कर्णधाराची पुनरागमनाची घोषणा. यंदाच्या हंगामात CSK ची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. संघ सध्या गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. गायकवाडच्या अनुपस्थितीत संघाच्या टॉप ऑर्डरवरही परिणाम झाला आहे.

धोनीच्या नेतृत्वाचा अनुभव संघाला नक्कीच उपयोगी पडेल. धोनी ४३ वर्षांचा आहे. त्याने आतापर्यंत CSK साठी २३५ सामन्यांत कर्णधारपद भूषवले आहे, ज्यात ५ आयपीएल ट्रॉफी आणि २ चॅम्पियन्स लीग टी२० विजयांचा समावेश आहे. धोनीने २०२२ मध्ये रवींद्र जडेजाकडे नेतृत्व सोपवले होते, परंतु हंगामाच्या मध्यावर पुन्हा सूत्रे हाती घेतली. त्याने २०२४ मध्ये निवृत्तीचे संकेत दिले होते, पण आता संघाच्या गरजेनुसार तो पुन्हा मैदानात उतरतोय.

धोनीच्या पुनरागमनामुळे CSK ला उर्जितावस्था प्राप्त होईल, अशी आशा संघ व्यवस्थापनाला आणि चाहत्यांना आहे. आगामी सामने संघासाठी निर्णायक आहेत. धोनीचा अनुभव आणि नेतृत्वगुण ही CSK ला सावरण्याची मोठी संधी आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -