Friday, May 9, 2025

क्रीडाताज्या घडामोडीIPL 2025

RCB vs DC, IPL 2025: अव्वल स्थानी कोण?

RCB vs DC, IPL 2025: अव्वल स्थानी कोण?

मुंबई: आजचा सामना गुण तक्त्यामधील चार अव्वल स्थानांवरील दोन संघादरम्यान होणार आहे. दिल्ली कैपिटल अठराव्या हंगामातील सुरवातीचे तिन्ही सामने जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे तर बेंगळुरू चार पैकी तीन सामने जिंकून तिसऱ्या क्रमांकावर आहे. आज जर दिल्ली जिंकली तसेच त्यांचा रनरेट गुजरातपेक्षा चांगला असेल तर ती गुण तक्त्यात पहिल्याच क्रमांकावर येईल परंतु बेंगळुरू जिंकली आणि त्यांचा रनरेट चांगला असेल तर तिसऱ्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर झेप घेतील.


दोन्ही संघ एकमेकास आव्हान देऊ शकतील. दोघाकडे जबरदस्त फलंदाजी आणि उत्कृष्ट गोलंदाजी आहे. फिल सॉल्ट, विराट कोहली, पडीकल, पाटीदार असे एकापेक्षाएक फलंदाज आहेत. दुसऱ्या बाजूला दिल्लीकडे फ्रेझर, डुप्लेसिस, के एल राहुल, स्टब्स,यांच्या सारखे अनुभवी फलंदाज आहेत. दोघांचीही गोलंदाजी भन्नाट आहे, तेज गोलंदाज व फिरकी असा समतोल आहे.


बेंगळुरुच्या खेळपट्टीवर दोन्ही संघ आपले आयपीएलवरचे वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतील. आजच्या सामन्यात नानेफेकीचा कौल महत्त्वाचा असेल कारण जो नाणेफेक जिंकेल तो संघ प्रथम गोलंदाजी घेईल व समोरच्या संघावर दबाव टाकेल. तेज गोलंदाजीमध्ये दिल्लीचा संघ हा बेगलूरूपेक्षा वरचढ आहे कारण मिचेल स्टार्कचा सुरवातीचा स्पेल हा भेदक असू शकतो. त्या समोर खेळणे बेंगळुरूसाठी कठीण असेल. याउलट दुसऱ्या सत्रात फिरकी समोर फलंदाजांचा कस लागेल. चला तर बघूया आज कोण वरचढ ठरणार?


Comments
Add Comment