मुंबई : प्रसाद ओक, सई ताम्हणकर, समीर चौगुले आणि ईशा डे यांचा ‘गुलकंद’ हा मराठी सिनेमा लवकरच रिलीज होत आहे. नुकताच या सिनेमाचा धमाल ट्रेलर रिलीज झाला आहे. एकंदर मजेदार कॉमेडी सिनेमा पाहायला मिळणार आहे. या ट्रेलरमधून कथेचा अंदाज येतो.
गुलकंद’ही दोन जोडप्यांची कथा आहे. प्रसाद ओक आणि ईशा डे नवरा बायको आहेत. तर सई आणि समीर चौघुले यांची जोडी आहे. सई-समीरची मुलगी आणि प्रसाद-ईशाचा मुलगा एकमेकांच्या प्रेमात पडतात. तर दुसरीकडे प्रसाद आणि सई यांच्यात लग्नाआधी अफेअर असतं.
मुलांच्या निमित्ताने दोघं पु्न्हा भेटतात. इतक्या वर्षांनी भेटल्यावर प्रसाद आणि सई यांच्यात पुन्हा लफडं सुरु झालंय अशी शंका समीर आणि ईशाला येते. ते त्यांचा पाठलाग करतात. दोन्ही जोडप्यांच्या नात्याचं पुढे काय होतं हे सिनेमात बघायला मिळणार आहे. कॉमेडी आणि थोडा भावुक अशा क्षणांची सरमिसळ सिनेमात आहे.
lkand
एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने प्रस्तुत आणि वेलक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित, सचिन मोटे लिखित, सचिन गोस्वामी दिग्दर्शित ‘गुलकंद या चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत आणि शार्विल आगटे यांच्या मुख्य भूमिका आहेत. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया हे चित्रपटाचे निर्माते आहेत. हा सिनेमा १ मे २०२५ ला रिलीज होणार आहे.