मुंबई : ‘बिग बॉस ७’ची विजेती अभिनेत्री गौहर खान (Gauhar Khan) दुसऱ्यांदा आई होणार आहे. नुकतीच तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज दिली. ५ वर्षांपूर्वीच गौहरने जैद दरबारसोबत निकाह केला होता. तर २०२३ साली तिने पहिल्या बाळाला जन्म दिला. गौहर आणि जैदने गोंडस मुलाला जन्म दिला होता. तर आता लेकाच्या जन्मानंतर दोन वर्षात गौहर दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. बाळाच्या स्वागतासाठी गौहर आणि जैद आतुर आहेत.
गौहर खानने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती पती जैदसोबत एका व्हायरल गाण्यावर डायलॉग्स बोलतेय आणि डान्स करतेय. नंतर जैद गौहरच्या बेबी बंपवर हात ठेवतो. अशा पद्धतीने दोघंही गुडन्यूज रिव्हील करतात. गौहरने यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले,”तुमच्या प्रेमाची आणि प्रार्थनेची गरज आहे. बेबी २…”
View this post on Instagram
Murshidabad Voilence : नव्या वक्फ कायद्यावरून पश्चिम बंगाल हिंसाचार प्रकरणी २२ जणांना अटक
गौहरच्या या पोस्टवर चाहते आणि इतर कलाकार कमेंट करत प्रेमाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. लॉकडाऊनमध्ये गौहर आणि जैद यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली होती. जैदने तिला सुपरमार्केटमध्ये पाहिलं होतं. तिथेच तो तिच्या प्रेमात पडला. त्याने लगेच तिला मनातील भावना सांगितल्या. दोघं इन्स्टाग्रामवर बोलायला लागले. त्यांच्यात मैत्री झाली, मग ते प्रेमात पडले.