Friday, October 24, 2025
Happy Diwali

Dombivli News : डोंबिवली हादरली! रिक्षाचालकाकडून गतिमंद महिलेवर अत्याचार

Dombivli News : डोंबिवली हादरली! रिक्षाचालकाकडून गतिमंद महिलेवर अत्याचार

डोंबिवली : राज्यात अत्याचारांच्या घटनेच्या संख्येत वाढ होत आहेत. अशातच डोंबिवलीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. डोंबिवलीत ३० वर्षीय गतिमंद महिलेवर रिक्षाचालकाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एक ३० वर्षीय गतिमंद महिला डोंबिवलीतील सोनारपाडा येथे आपल्या नातेवाईकांकडे जात होती. यावेळी रिक्षाचालकाने महिला गतिमंद असल्याचा फायदा घेत तिला मुंब्रा येथील अज्ञात ठिकाणी नेले. तसेच तिच्यावर अमानुष अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी पीडितेने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबाला सांगितला. त्यानुसार कुटुंबाने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. फैजल खान असे या आरोपी रिक्षाचालकाचे नाव असून, टिळक नगर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला तत्काळ कारवाई करत अटक केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा