Friday, April 18, 2025
Homeताज्या घडामोडीShah Rukh Khan : DDLJने रचला इतिहास! शाहरुख-काजोलचा पुतळा लंडनमध्ये उभारणार

Shah Rukh Khan : DDLJने रचला इतिहास! शाहरुख-काजोलचा पुतळा लंडनमध्ये उभारणार

मुंबई : बॉलीवूडचा किंग खान (Shah Rukh Khan) आणि काजोल (Kajol) यांचा १९९५ साली प्रदर्शित झालेला ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ (DDLJ) या चित्रपटाने अजूनही प्रेक्षकांच्या मनात वेगळंच घर निर्माण केलं आहे. राज आणि सिमरनची प्रेमकथा पाहण्यासाठी लोक आजही वेडे आहेत. या भारतीय चित्रपटाबाबत अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. लंडनच्या प्रसिद्ध लीसेस्टर स्क्वेअरमध्ये ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’चा खास कांस्य पुतळा उभारण्यात येणार आहे.

Western Railway Megablock : पुढील दोन दिवस पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बोब्लॉक! ३४४ लोकल सेवा रद्द

डीडीएलजेमधील अनेक महत्त्वाची दृश्यं लंडनमध्ये चित्रीत झाली होती. विशेषतः लीसेस्टर स्क्वेअर हे ठिकाण त्या दृश्यात दिसत आहे. जिथे राज (शाहरुख) आणि सिमरन (काजोल) पहिल्यांदा अनोळखीपणे एकमेकांसमोर येतात. हा नवीन पुतळा ओडिऑन (Odeon) सिनेमाजवळ, म्हणजेच त्या दृश्याच्या पार्श्वभूमीत, बसवण्यात येणार आहे. हा चित्रपट लंडनमधील लेस्टर स्क्वेअरमधील प्रसिद्ध ‘सीन्स इन द स्क्वेअर’ चित्रपटाच्या ट्रेलमध्ये सन्मानित करण्यात आला आहे. यशराज फिल्म्सच्या मते, हार्ट ऑफ लंडन बिझनेस अलायन्सने घोषणा केली आहे की लेस्टर स्क्वेअरमधील रोमांचक ‘सीन्स इन द स्क्वेअर’ चित्रपटाच्या ट्रेलमध्ये एक नवीन पुतळा सामील होईल, ज्यामध्ये ऐतिहासिक ब्लॉकबस्टर दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (डीडीएलजे) चा लंडनमध्ये उभारण्यात आलेला पुतळा असेल.

ही कांस्य मूर्ती शाहरुख खान आणि काजोल यांना चित्रपटातील त्याच्या आयकॉनिक पोजमध्ये आहे. या पुतळ्याचे अनावरण २०२५ च्या वसंतात होणार असून, यावेळी डीडीएलजे (DDLJ) च्या ३० व्या वर्धापन दिनाचाही मोठा उत्सव सुरू होईल.

हार्ट ऑफ लंडन बिझनेस अलायन्सचे मार्क विल्यम्स म्हणाले, “DDLJ हा केवळ चित्रपट नाही, तर एक भावना आहे. जगभरातल्या प्रेक्षकांनी याला डोक्यावर घेतलं आहे.” यशराज फिल्म्सचे सीईओ अक्षय विधानी म्हणाले, “DDLJ ने बॉलिवूडमध्ये नवा अध्याय सुरू केला. ३० वर्षांनीही या चित्रपटाचा प्रभाव तसाच आहे. ही मूर्ती त्याच्या आंतरराष्ट्रीय ओळखीचं प्रतीक आहे.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -