Friday, April 18, 2025
Homeताज्या घडामोडीभाजपा ‘वक्फ दुरुस्ती जागरुकता अभियान’ देशभरात राबवणार

भाजपा ‘वक्फ दुरुस्ती जागरुकता अभियान’ देशभरात राबवणार

दिल्लीतील भाजपा मुख्यालयात कार्यशाळेचे आयोजन

नवी दिल्ली : भाजपा २० एप्रिल ते ५ मे पर्यंत ‘वक्फ दुरुस्ती जागरूकता अभियान’ देशभरात राबवणार आहे. वक्फ दुरुस्ती कायद्यातील सुधारणांच्या फायद्यांची माहिती मुस्लीम समाजाला देणे. वक्फ दुरुस्ती कायद्याविरोधात काँग्रेस आणि विरोधी पक्षांकडून जे बोलले जात आहे. त्याविरोधात नागरिकांमध्ये जागरुकता करणे, हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. या अभियानाची तयारीसाठी राजधानी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात एका कार्यशाळेचे आयोजनही करण्यात आले होते. या कार्यशाळेला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरण रिजेजू यांनी संबोधित केले.

26/11 MasterMind Tahawwur Rana : तहव्वूर राणाला भारतात आणले, तिहारमध्ये ठेवणार; NIA २६/११ प्रकरणी चौकशी करणार

वक्फ दुरुस्ती कायद्यामुळे वंचित मुस्लिमांचा फायदा होईल. विशेषतः शिक्षण आणि आरोग्यसेवा यासारख्या क्षेत्रात वक्फ मालमत्तेचा अधिक चांगला वापर होईल, असे जे. पी. नड्डा कार्यशाळेत म्हणाले. वक्फ विधेयकाबाबत काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी तुष्टीकरणाचे राजकारण केले आहे. मुस्लिम समुदायाची दिशाभूल केली आहे, अशी टीका नड्डा यांनी केली.

भाजप कार्यकर्ते मुस्लिम बंधू-भगिनींपर्यंत सक्रियपणे पोहोचतील जेणेकरून विरोधी पक्षांचा खोटेपणा उघड होईल आणि कायद्याचा खरा हेतू आणि फायदे स्पष्ट होतील, असे नड्डा म्हणाले. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी कार्यशाळेत वक्फ सुधारणांबद्दल सविस्तर माहिती दिली. भाजपने प्रत्येक राज्यातील अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्षांसह तीन ते चार नेत्यांना या कार्यशाळेत उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले होते. जिल्हास्तरीय भाजप नेत्यांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांच्या संबंधित राज्यात अशाच कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश या नेत्यांना देण्यात आले आहेत. या अभियानाद्वारे, भाजपचा हेतू वक्फ सुधारणांबद्दलचे सत्य तळागाळातील पातळीपर्यंत पोहोचवणे आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -