उल्हासनगर : खोपोली, कर्जत, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर येथून नोकरीच्या निमित्ताने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गाड्यांची संख्या वाढवली, निवडक १५ डब्यांच्या गाड्या सोडल्या तरी गर्दी कमी होत नाही. याच गर्दीचा फटका एका २५ वर्षाच्या तरुणाला बसला. अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळ २५ वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू झाला.
Pawar : सोशल मीडिया स्ट्रॅटेजी प्लॅनरची मुलगी होणार अजित पवारांची सून
लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू झाला. रोहित मगर असे या तरुणाचे नाव आहे. तो उल्हासनगरच्या सम्राट अशोक नगरचा रहिवासी होता.
रोहित मगर अंबरनाथहून उल्हासनगरला लोकलने प्रवास करत होता. कानसाई ते उल्हासनगर दरम्यान त्याचा अपघात झाला. लोकलमधून पडून झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात मृतदेह पाठवण्यात आला. रोहितचा अपघात नेमका कसा झाला, याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.